शेतीशिवार टीम : 29 जुलै 2022 :- Honda Cars India साठी भारतात गेल्या काही महिन्यांपासून वाईट काळ सुरु झाला असून कंपनीच्या विक्रीत सातत्याने घट होताना दिसून येत आहे. या कारणांमुळे कंपनी भारतात कोणतंही नवीन मॉडेल आणत नाहीये. विक्रीत घट झाल्यामुळे कंपनीला ग्रेटर नोएडामधील आपला प्रॉडक्शन कारखानाही बंद करावा लागला.

विशेष म्हणजे, प्लांटने 2020 च्या अखेरीस सिविक (Civic) आणि CR-V सारख्या प्रीमियम सेगमेंट कारचे प्रॉडक्शन थांबवलं होतं. आता फक्त कंपनी राजस्थानातील तापुकारा येथे एकमेव प्लांट चालवत आहे.

Honda City, Jazz आणि WR-V होणार बंद :-

ET ऑटोच्या रिपोर्टनुसार, Honda Cars India पुढच्या वर्षी मार्च 2023 पर्यंत त्यांच्या 3 कार बंद करणार आहे.कंपनी ज्या कार बंद करणार आहे त्या 4th जनरेशन सिटी (City) , जॅझ (Jazz) आणि डब्ल्यूआरव्ही (WR-V) क्रॉसओवर आहेत. यापैकी जॅझ ही कार लवकर बंद होणार आहे. Honda Jazz चे उत्पादन ऑक्टोबर 2022 मध्ये थांबेल.

त्यानंतर, Honda डिसेंबर 2022 मध्ये 4th जनरेशन सिटी सेडान चे उत्पादन आणि शेवटी मार्च 2023 मध्ये WRV क्रॉसओव्हरचे प्रॉडक्शन थांबवणार आहे. याचा अर्थ मार्च 2023 नंतर Honda Cars India भारतात फक्त 5th जनरेशनतील सिटी, सिटी हायब्रिड आणि अमेझ सेडान ची विक्री करेल. परंतु, भारतीय बाजारपेठेत, कंपनी एसयूव्ही (SUV) सेगमेंटसह पुनरागमन करू शकते. कंपनी या सेगमेंटवरही काम करत आहे.

Honda लवकरच भारतात आपली नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. Honda साठी Amaze आणि City आहे. Amaze चा एकूण मार्केट शेअर 50% आणि सिटीचा 30% आहे. पण WR-V चा मार्केट शेअर 12% आहे आणि Jazz चा 8% आहे. त्यामुळे विक्रीत घट झाल्याने या दोन्ही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *