शेतीशिवार टीम : 29 जुलै 2022 :- पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ तब्बल 2 लाख 71 हजार 341 लाभार्थ्यांना देण्यात आला. या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे बँक खात्यावर तब्बल 113 कोटी 63 लाख 28 हजार रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविणेत येते. गर्भवती किंवा प्रसूती झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 4 टप्प्यांत 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

गर्भवती किंवा स्तनदा माता ज्या केंद्र, राज्य शासनाच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत. अशा मातांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या माता अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्यान्वये घेत असतील, त्यांनाही हा लाभ मिळत नाही.

हे अनुदान 4 टप्प्यांत दिलं जातं…

1) 150 दिवसांत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणा नोंदणी केल्यावर 1 हजार रुपयांचा हप्ता
2) गरोदरपणाच्या काळात सहा महिन्यांनंतर किमान एक केल्यानंतर २ हजार रुपयांचा हप्ता .
3) बाळाच्या जन्मानंतर बाळाचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर 2 हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्याला मिळतो.
4) एखाद्या गर्भवती महिलेने रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यास किंवा जननी सुरक्षा योजनेची लाभार्थी असल्यास 1 हजार रुपयांचा हप्ता.

ही कागदपत्रे आवश्यक :-

शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी केलेले लाभाथ्यचि कार्ड राष्ट्रीयीकृत बँक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत
पती व पत्नी यांचे आधार कार्ड
बाळाच्या जन्माचा दाखला
प्राथमिक लसीकरण झालेले कार्ड

अर्ज कसा कराल ?

‘या’ योजनेसाठी महिलांनी ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही प्रकारे करू शकता…

ऑफलाईन अर्जासाठी महिलांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधून फॉर्म भरून अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

मातृत्व वंदना योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. ऑनलाइन नोंदणीसाठी खालील स्टेप्स फॉलो करा :-

सर्वप्रथम इच्छुक अर्जदाराने PMMVY योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी :- इथे क्लिक करा

या नंतर अर्जदाराच्या समोर होम पेज उघडेल. होमपेजवर तुम्हाला लॉगिन फॉर्म दिसेल.

आता तुम्हाला या लॉगिन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावी लागेल जसे की ईमेल आयडी, पासवर्ड कॅप्चा कोड इ…

सर्व डिटेल्स भरल्यानंतर, तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावं लागेल.

लॉगिन केल्यानंतर तुम्ही “प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना” साठी ऑनलाइन अर्ज करू शकता…

आता तुम्हाला ऑनलाइन अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर, दिलेली माहिती एकदा तपासा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *