शेतीशिवार टीम : 05 सप्टेंबर 2022 : Hop Oxo Electric Bike : देशात इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता भारतातील टॉप ची इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता HOP Electric Mobility ने आपली नवीन स्टायलिश आणि फीचर्स लोडेड बाईक HOP OXO लाँच केली आहे.

रोज टू-व्हीलर वापरणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही बाईक खास तयार करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 150Km अंतर कापू शकते. HOP OXO ची किंमत रु. 1.25 लाख पासून सुरू होते.

कीमत आणि वॉरंटी :-

HOP इलेक्ट्रिकने OXO इलेक्ट्रिक बाइक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे, ज्यात OXO आणि OXO-X समाविष्ट आहे. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही या बाइक्स फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकता. ही 14 राज्यांमध्ये आणि देशातील 150+ स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

OXO :-

किंमत : 1,24,999 रुपये
3 वर्षे / 50,000 किलोमीटर वॉरंटी

OXO-X :-

किंमत : 1,39,999 रुपये
4 वर्षे / अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी

फीचर्स :-

OXO आणि OXO-X इलेक्ट्रिक बाइक्सचे डिजाइन आणि रेंज सारखीच आहे, परंतु फीचर्स आणि किंमतीमध्ये फरक आहे. या बाइक्स पूर्ण चार्ज केल्यावर 150km अंतर कापू शकतात. ते कनेक्टड फीचर्ससह येतात, तुम्ही अँपच्या मदतीने त्यांना मोबाइलशी कनेक्ट करू शकता. टर्बो मोड फीचर्स OXO-X मध्ये उपलब्ध आहे, बाइकला 0-40 चा वेग पकडण्यासाठी 3.5 सेकंद लागतात. बाइकचा टॉप स्पीड 95kmph आहे.

या बाइक्स इंडियन रोड्स आणि हवामानानुसार डिझाइन केल्या आहेत जेणेकरून त्यांच्या परफॉमन्समध्ये कोणतीही कमी राहणार नाही. या बाइक्सचे डिझाईन स्टायलिश असून ते हुबेहूब Honda Hornet सारखीच दिसत असून प्रत्येक तरुणाला त्या आवडतील. त्यांची पे-लोड कपॅसिटी 350 किलो आहे. बाइक्सना सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी 180mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.

एडवांस्ड डिस्प्ले :-

या बाईकमध्ये संपूर्ण डिजिटल डिस्प्ले आहे ज्यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात, या डिस्प्लेमध्ये नेव्हिगेशन व्यतिरिक्त बाईक किती किलोमीटर धावेल, स्पीड, सर्व्हिस इंडिकेटर अशा अनेक महत्त्वाच्या फीचर्सची माहिती मिळते. ही एक कनेक्टेड बाइक आहे जी तुम्ही अँपद्वारे कनेक्ट करू शकता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *