शेतीशिवार टीम, 12 मार्च 2022 : Hyundai ची सर्वात स्वस्त आणि लहान साइज ची SUV व्हेन्यू भारतीय लोकांच्या पसंतीत उतरली आहे. आणि आता कंपनीने त्याच्या फेसलिफ्ट मॉडेलची टेस्ट सुद्धा सुरू केली आहे. Hyundai Venue फेसलिफ्ट यावर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि कंपनी मोठ्या चेंजेसह ही SUV मार्केट मध्ये आणणार आहे.
नवीन वेन्यू एक्सटीरियर आणि इंटीरियर याशिवाय नवीन फीचर्ससह ऑफर केले जात आहे, परंतु त्यात कोणतेही Technical बदल होण्याची शक्यता कमी आहे.
10.25 – इंच टचस्क्रीन सिस्टम :-
डिझाईनबद्दल बोलायच म्हटलं तर, कारला पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल मिळेल,जे अपडेटेड क्रेटा आणि नवीन टक्सनसारखे असेल. येथील स्प्लिट हेडलॅम्प्स तसेच राहण्याची अपेक्षा आहे. कारला नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतील, जे तिचा लूक सुधारणार आहेत, तर मागील बाजूस नवीन स्प्लिट एलईडी टेललॅम्प्ससह (Ionic 5) सारखे त्रिकोणी एलिमेंट मिळू शकतात.
कारच्या केबिनमध्ये 10.25 – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळेल. याशिवाय कंपनी कारला नवीन कलर इंटीरियर आणि फ्रेश लुकिंग अपहोल्स्ट्री देत आहे.
6 एअरबॅग्ज, EBD सह ABS :-
Hyundai Venue फेसलिफ्टवरील इतर फीचर्समध्ये अगली वेंटिलेटेड सीट्स असतील आणि 8 – स्पीकर बोस साउंड सिस्टीम यांचा समावेश आहे. येथे तुम्हाला वायरलेस फोन चार्जर,अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले,ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स मिळेल. सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत.
पहिल्या सारखाच इंजन ऑप्शन :-
1.5-लीटर डिझेल इंजिन पर्याय पूर्वीप्रमाणेच व्हेन्यू फेसलिफ्टसह,1.2-लीटर पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह आढळू शकतात. ही इंजिने क्रमशः 83 PS, 120 PS आणि 100 PS पॉवर बनवतात. Kia Sonnet च्या धर्तीवर, Hyundai Venue ला डिझेल ऑटोमॅटिक इंजिन देखील मिळू शकते जे 115 PS पॉवर जनरेट करते आणि कंपनीने ते 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गियरबॉक्सने लेस केले आहे.
या कारची अंदाजे एक्स-शोरूम किंमत 7 लाख रुपये आहे. आणि ती Kia Sonnet, Tata Nexon, Nissan Magnite, Mahindra XUV300 आणि आगामी नवीन पिढीच्या Maruti Suzuki Vitara Brezza यांच्याशी कॉम्पिटीशन करेल.