शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 72 तासांत 200 हून अधिक निवासी डॉक्टर Corona पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत Covid-19 रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे अन् अशा परिस्थितीत हे नवं संकट मुंबईपुढे उभं राहील आहे.

सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयातील अनेक डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र हे पुन्हा एकदा Covid-19 सर्वाधिक बाधित राज्यांपैकी एक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 200 डॉक्टरांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आल्याने राज्यभरातील डॉक्टरांची संख्या 291 च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) चे अध्यक्ष डॉ अविनाश दहिफळे म्हणाले की, शहरात निवासी डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांची काळजी घेणं सध्या कठीण होत आहे.

डॉक्टर आणि परिचारिकांची तात्पुरती नियुक्ती :-

पूर्णपणे लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संसर्ग पसरल्यामुळे अनेक खाजगी रुग्णालयांनी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर आणि परिचारिकांची नियुक्ती केली आहे. बुधवारी, वांद्र्याच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये कोविडमुळे नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांची 30% कमतरता नोंदवली गेली.

सध्या मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील किमान 30 कर्मचारी सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत, ज्यात 17 डॉक्टर आणि परिचारिकांचा समावेश आहे.

त्यांपैकी काहींना मध्यम लक्षणांसह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काहींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोणत्याही डॉक्टरांना गंभीर लक्षणे नाहीत :-

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) ने सामायिक केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, गुरुवारपर्यंत, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये 290 निवासी डॉक्टर COVID-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

MARDचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे म्हणाले, 3 जानेवारीपासून ही मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर 70 डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले. मात्र, एकाही डॉक्टरला गंभीर आजार नाही. यातील बहुतांश सौम्य आणि मध्यम लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *