शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. Vistara Airlines ने आजपासून पुढील तासांमध्ये म्हणजेच 6 जानेवारीपर्यंत तिकीट दरात मोठी सूट दिली आहे. Vistara Airlines मध्ये टाटा सन्स आणि SIA ची 51:49 शेअरहोल्डिंग आहे. कंपनीच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त भाड्यात मोठी सूट देण्यात आली आहे.
Vistara Airlines च्या वतीने ट्विट करत असं लिहिले आहे की, 7 व्या वर्धापन दिनानिमित्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर विशेष भाडे जाहीर केले जात आहे.
देशांतर्गत प्रवासी एकेरी प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट रु. 977, प्रीमियम इकॉनॉमी तिकीट रु. 2677 आणि बिझनेस क्लासचे तिकीट रु. 9,777 मध्ये खरेदी करू शकतात.
दुसरीकडे, दिल्ली ते ढाका इकॉनॉमी क्लासची तिकिटे 13,880 रुपयांना, मुंबई ते मालदीव प्रीमियम क्लासची तिकिटे 19,711 रुपयांना आणि मुंबई ते सिंगापूर बिझनेस क्लासची तिकिटे 47,981 रुपयांना खरेदी करता येतील. यासाठी 48 तासांमध्ये केलेले बुकिंग 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वैध असणार आहे.
जम्मू ते श्रीनगरचे भाडे – 977 रु.
दिल्ली ते पाटणा हवाई प्रवासासाठी – 1977 रु.
बेंगळुरू ते हैदराबाद हवाई प्रवासासाठी – 1781 रु.
Vistara Airlines ची संपूर्ण ऑफर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करें–
मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी – 2112 रु.
दिल्ली ते गुवाहाटी – 2780 रु.
Vistara Airlines च्या ऑफिशिअल वेबसाइटवर www.airvistara.com किंवा मोबाइल अँवरून तिकीट बुक केले जाऊ शकते. याशिवाय ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातूनही तिकीट बुकिंग येणार आहे.