Interview Question : असा कोणता प्राणी ये जो सकाळी 4 पाय, दुपारी 2 पाय आणि संध्याकाळी 3 पायांवर चालतो ?
शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : आपल्या देशात दरवर्षी UPSC परीक्षा आयोजित केली जाते ज्यामध्ये लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात.लाखो विद्यार्थी या परीक्षेला असे बसतात, तर अनेक विद्यार्थी आहेत जे रात्रंदिवस कठोर अभ्यास करून अधिकारी होण्याच्या इच्छेने या परीक्षेला बसतात, काहीजण ही परीक्षा पहिल्यांदा देतात, तर काहींची तीन ते चौथी वेळ असती परीक्षा देण्याची.
UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते, पहिल्या टप्प्यात प्राथमिक परीक्षा, ती उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा आणि शेवटी इंटरव्यूचे आयोजन केले जाते.
इंटरव्यूसाठी सखोल प्रश्न आणि अवघड प्रश्न निवडणे खूप गरजेचं असतं ,कारण या वेळी किचकट प्रश्नही विचारले जातात. यादरम्यान असे प्रश्न विचारले जातात की गुणवंत विद्यार्थीही मागे राहतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे गेल्या काही वर्षात उमेदवारांनी विचारले आहेत.
प्रश्न : एका मिनिटात 61 सेकंद असतात का ?
उत्तर: होय, अर्थातच, प्रत्येक वर्षी दोन मिनिटे एक्सट्रा असतात ज्यामध्ये 61 सेकंद येतात.
प्रश्न : झाडावर पाच पक्षी बसले आहेत, त्यापैकी दोन पक्षांनी उडून जाण्याचा निर्णय घेतला. आता सांगा त्या झाडावर किती पक्षी बसले आहेत ?
उत्तर : पाचच कारण त्यावेळी त्या दोन पक्ष्यानी फक्त उडून जाण्याचा निर्णय घेतलाय पण ते उडले नाहीत…
प्रश्न : 24 तासांत माणूस किती वेळा श्वास घेतो ?
उत्तर : माणूस दिवसातून 17 ते 30 हजार वेळा श्वास घेतो.
प्रश्न : असे कोणते उत्तर आहे ज्याचे उत्तर ‘होय’ने देता येत नाही ?
उत्तर : या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे, तुम्ही झोपेत आहात का ?
प्रश्न : कोणता प्राणी सकाळी 4 पाय, दुपारी 2 पाय आणि संध्याकाळी 3 पायांनी चालतो ?
उत्तर : जेव्हा मानवी मूल जन्माला येते तेव्हा त्याची सकाळ असते, यावेळी तो गुडघे आणि 2 हाताच्या बळावर रांगतं म्हणजेच ४ पायांच्या जोरावर चालतो. दुपारी दोन पाय, म्हणजे तो तरुण असताना, त्याच्या दोन पायांवर चालण्यास सक्षम असतो आणि तीच त्याची दुपार असते. आणि माणूस म्हातारा झाल्यावर काठी घेऊन चालतो, मग त्याची संध्याकाळ होते आणि तो 3 पायांनी चालतो.
प्रश्न अगदी सरळ आणि सोडवलेले असतात पण संयमाने समजून घेणे आवश्यक असते आणि असे प्रश्न घाईघाईने आपण पास करतो आणि लक्ष देत नाही. त्यामुळे अशा प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.