Take a fresh look at your lifestyle.

खरचं Safari, Alcazar आणि मारुती XL6 पेक्षा नवी Kia Carens चांगली आहे का ?, पहा कोणती आहे BEST…

0

शेतीशिवार टीम, 16 फेब्रुवारी 2022 : Best 7-Seater SUV : Kia Carens भारतात लॉन्च होणारी सर्वात नवीन थ्री-रो SUV बनली आहे. Carens ही 7-सीटर SUV असून त्यामध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स अन् आकारातही ती बऱ्याच 7-Seater SUV पेक्षा मोठी आहे. 

या सेगमेंटमधील किमतीच्या बाबतीतही या SUV ची किंमत आर्थिकदृष्ट्या परवडणारी दिसते. फीचर्सच्या बाबतीत, ती Hyundai Alcazar आणि Tata Safari शी थेट टक्कर देणारी आहे, तर तिची किंमत मारुती XL6 पेक्षाही कमी असून अधिक परवडणारी थ्री-रो SUV बनवते.

Kia Carens तीन इंजिन ऑप्शनची ऑफर केली आहे.1.5-लीटर नॅचुरली – एस्पिरेटेड पेट्रोल यूनिट,1.4-लीटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल आहे. यात ट्रान्समिशन ऑप्शन देखील आहेत. Carens अनेक जबरदस्त फीचर्सनी सुसज्ज आहे.

यात 10.25 – इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि सनरूफ देखील आहे. यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने यात व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर, डाउनहिल ब्रेकिंग कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, ब्रेक असिस्ट यांचा समावेश आहे. Kia ने सहा आणि सात सीटर लेआउटसह Carence ऑफर केली आहे.

Maruti Suzuki XL6 ची थेट स्पर्धा :-

Maruti Suzuki XL6 मध्ये फक्त एक पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे एक अतिशय आरामदायक व्हीकल आहे, जे एक शानदार पोस्ट-सेल्स नेटवर्क सपोर्ट करते. त्याची रीसेल वैल्यू देखील खूप चांगली आहे. त्याच्या Zeta व्हेरिएंटची किंमत 10.14 लाख रुपये,अल्फा 10.82 लाख रुपये, Zeta AT 11.34 लाख रुपये आणि Alpha AT 12.02 लाख रुपये आहे. XL6 च्या तुलनेत Karens चे पेट्रोल व्हेरियंट कितपत किफायतशीर असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

Alcazar आणि Safari बद्दल पाहू :-

त्याचप्रमाणे Hyundai Alcazar ची किंमत 16.34 लाख रुपयांपासून सुरू होते. जे टॉप मॉडेलसाठी 19.99 पर्यंत जाते. दुसरीकडे, टाटा सफारी 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.29 लाख रुपयांपर्यंत जाते. हेच कारण आहे की, कॅरेन्स (Carens) त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत किमतीच्या बाबतीत खूपच Affordable दिसते. मंगळवारी ऑफिशियल लॉन्च होण्यापूर्वीच, Carens साठी 19,000 पेक्षा जास्त बुकिंग आधीच झाले होते. याचा सरळ अर्थ असा आहे की तो या सेगमेंटमधील अनेक गाड्यांना ही SUV मात देऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.