Take a fresh look at your lifestyle.

Safari, Nexon सहित Tata च्या या वाहनांवर तब्बल 40 हजारापर्यंत सूट ; पहा डिटेल्स…

0

शेतीशिवार टीम, 16 फेब्रुवारी 2022 : Tata Motors फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या अनेक वाहनांवर डिस्काउंट तसेच दमदार ऑफर देत आहे. कंपनी Tiago,Tigor, Nexon,Harrier आणि Safari वर 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. ग्राहक या एक्सचेंज बोनस, कॅश एक्सचेंज बोनस तसेच कॉर्पोरेटचा लाभ घेऊ शकतात.

कंपनी नवीन Tata Tiago आणि Tigor वर Rs 10,000 ची कॅश डिस्काउंट आणि Rs 10,000 चे एक्सचेंज बोनस देत आहे. तरीपण, या ऑफर Tiago CNG आणि Tigor CNG वर लागू नाहीत.

याशिवाय,ग्रामीण लाभ म्हणून 2500 रुपये, कॉर्पोरेट लाभ म्हणून 3,000 आणि (Health workers) आरोग्य कर्मचार्‍यांना 3,000 रुपयांचा लाभ देत आहे.

Nexon वर ऑफर :-

Tata Nexon कॉम्पॅक्ट SUV वर 15,000 चा एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट आणि हेल्थ वर्कर स्कीम अंतर्गत पेट्रोल ट्रिमवर 3,000 आणि डिझेल वाहनांवर 5,000 ऑफर करत आहे. ही ऑफर डार्क एडिशन रेंज सोडून संपूर्ण Nexon रेंजवर लागू आहे.

Tata Safari, Harrier वर ऑफर :- 

Tata Harrier आणि सफारीवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. याव्यतिरिक्त, हॅरियरला ग्रामीण लाभ, कॉर्पोरेट सवलत आणि (हेल्थ वर्कर्स) आरोग्य कर्मचार्‍यांसाठी ₹5,000 ची सूट देखील मिळेल.ही ऑफर कारच्या सर्व वेरिएंट्सवर लागू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.