शेतीशिवार टीम, 15 फेब्रुवारी 2022 : Kia Motor India कडून भारतात Kia Carens आज लॉन्च करण्यात आली आहे. Seltos, Carnival आणि Sonnet नंतर Kia चे भारतातील हे चौथे जबरदस्त प्रॉडक्ट आहे. जवळपास महिनाभरापासून कंपनीला 19000 हून अधिक बुकिंग मिळालं आहे. Kia Carens हे भातातील अनंतपूर येथील कारखान्यात बनवलं जातं आहे. या प्रॉडक्टची भारतात बनवून परदेशात निर्यात करण्याची कंपनीने योजना आखली आहे.
Kia Motor India ने वाहन 6 आणि 7-सीटर मध्ये (MPV) मध्ये लाँच केली असून याची एक्स-शोरूम किंमत रु. 8.99 लाख आहे. कंपनीने प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या 5 प्रकारांमध्ये Carence मॉडेल लाँच केलं आहे.
Carence या MPV च्या टॉप मॉडेलची किंमत 16.99 लाख रुपयांपर्यंत जाते. स्पर्धेत टिकण्यासाठी या कंपनीने कारमध्ये बरेच फीचर्स दिले आहेत आणि केबिन देखील खूपच आरामदायक बनवली आहे. 6-सीटर व्हेरियंटमध्ये, ग्राहकांना मधल्या रांगेत कॅप्टन सीट मिळणार आहे, तर बेंच सीट 7-सीटर मॉडेल बरोबर देण्यात आली आहे.
MPV सोबत 6 एअरबॅग :-
Carens अनेक जबरदस्त फीचर्सनी सुसज्ज आहे. यात 10.25 – इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि सनरूफ देखील आहे. यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने यात व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर, डाउनहिल ब्रेकिंग कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, ब्रेक असिस्ट यांचा समावेश आहे. Kia ने सहा आणि सात सीटर लेआउटसह Carence ऑफर केली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कार मजबूत करण्यात आली असून या MPV सोबत 6 एअरबॅग्ज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम यांसारखे शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.
Carence ची थेट Ertiga आणि Innova Christa शी स्पर्धा :-
Kia Carens तीन इंजिन ऑप्शनसह येते. यामध्ये 1.5-लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर, 1.4-लीटर टर्बो पेट्रोल युनिट आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. त्याचे 1.5-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्क निर्माण करते, तर 1.4-लिटर, चार-सिलेंडर, टर्बो-चार्ज केलेले इंजिन 140hp पॉवर आणि 242Nm टॉर्क निर्माण करते. 1.5-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन 115hp पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क निर्माण करते.
कंपनीने या तीन इंजिनांसह नेहमीचा 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे, तर टर्बो-पेट्रोल आणि ऑइल बर्नर इंजिनसह ऑप्शनमध्ये अनुक्रमे 7-स्पीड DCT आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेत Carence ची थेट स्पर्धा ग्राहकांच्या आवडत्या मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Artiga)आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Christa) यांच्याशी होणार आहे.