शेतीशिवार टीम, 15 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : SD कार्डमध्ये किती सोनं वापरले जाते ?
उत्तर : सोने हे खूप चांगलं कंडक्टर आहे. जे आपला डेटा आणि ट्रान्सफर स्पीड वाढवतं. यामुळेच SD कार्डमध्ये सोन्याच्या धाग्यासारखी तार वापरली जाते. स्टॅंडर्ड आकाराच्या मेमरी कार्डमध्ये सुमारे 10 ते 12 पैशांचं सोनं असतं.
प्रश्न : SC आणि ST कॅटेगरीमध्ये नेमका काय आहे फरक ?
उत्तर : SC कॅटेगरी म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले लोकं…
ST कॅटेगरी म्हणजे सामाजिक शोषणाचे बळी ठरलेले लोकं….
प्रश्न : असं काय आहे, जे जेवढं जास्त स्वछ केलं जात तितकं ते काळ होतं ?
उत्तर : फळा (Black board)
प्रश्न : जगात असा कोणता देश आहे, जिथं साप आढळत नाही ?
उत्तर : न्यूझीलंड (New Zealand) हा जगातील असा देश आहे जिथे एकही साप आढळत नाही…
प्रश्न : माचीसचा शोध कोणी व कधी लावला ?
उत्तर : 31 डिसेंबर 1827 रोजी माचीसचा शोध लागला. त्याचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव ‘जॉन वॉकर’ (John Walker) असं आहे. जो ब्रिटनमधील शास्त्रज्ञ होता. जॉन वॉकरने अशी माचिसची काडी बनवली होती, जी कोणत्याही खडबडीत जागी घासून जाळली जात असे.
प्रश्न : बळीच्या बकर्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ?
उत्तर : Scapegoat – (स्कॅपगोट)
प्रश्न : जगातील असा कोणता देश आहे तिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही ?
उत्तर : भूटान
प्रश्न : 01 वर्षात किती तास असतात ?
उत्तर : 8760
प्रश्न : असा कोणता जीव आहे, त्याला कान व डोळे ही नाहीत ?
उत्तर : गांडुळ.
प्रश्न : मानवी मेंदूची स्टोरेज कॅपिसिटी किती आहे ?
उत्तर : मानवी मेंदूची ब्रेन स्टोरेज कॅपिसिटी (Brain storage capacity) ही 10 लाख GB आहे.
प्रश्न : असं कोणतं काम आहे, जे अविवाहित मुली करू शकत नाही ?
उत्तर : अविवाहित मुली सिंदूर लावू शकत नाही अन् मंगळसूत्र घालू शकत नाही, तसेच ती घटस्फोटही देऊ शकत नाही !
प्रश्न : एक मनुष्य आपल्या आयुष्यातील सरासरी किती वर्षे हे झोपण्यामध्ये व्यतीत करतो ?
उत्तर : 18 ते 25 वर्षे
प्रश्न : जगातील सर्वात उंच झाड कोणतं आणि ते कुठे आढळलं ?
उत्तर – कॅलिफोर्नियामधील रेडवुड (Redwood) नॅशनल पार्कमध्ये उभे असलेले कोस्ट रेडवुड हे जगातील सर्वात उंच जिवंत वृक्ष आहे, उंची 115.66 मीटर उंच म्हणजेच 379 फुटांचं हे झाड आहे. हे वृक्ष कुतुबमिनार पेक्षाही उंच आहे.
प्रश्न : आपल्या पृथ्वीचे वजन किती आहे ?
उत्तर : आपल्या पृथ्वीचे वजन, 5.972 × 10^24 किलो *13,170,000,000,000,000,000,000,000 पौंड*
(किंवा *5,974,000,000,000,000,000,000,000 Kilograms )* म्हणजे 5.9 ट्रिलियन ट्रिलियन (Trillion) Kilograms
प्रश्न : NCC ची सुरुवात कधी झाली ?
उत्तर : NCC (National Cadet Corps) ची सुरुवात 15 जुलै 1948 रोजी नॅशनल कॅडेट कॉर्प्स अँक्ट अंतर्गत झाली. त्याला युनिव्हर्सिटी ऑफ ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स (UOTC) चा उत्तराधिकारी मानण्यात आलं.
प्रश्न : Google एका सेकंदात किती पैसे कमावतो ?
उत्तर : गुगलचे जुने नाव “बेकरब” होतं. 1996 पासून ते Google म्हणून ओळखलं जाऊ लागलं. Google हे जगातील सर्वात मोठं आणि जगातील प्रथम क्रमांकाचं सर्च इंजिन आहे, जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनच्या एका सेकंदाची कमाई सुमारे $807 आहे, जी भारतीय रुपयांनुसार सुमारे 59 हजार 607 रुपये आहे. आणि Google ची प्रति मिनिट कमाई सुमारे 35 लाख 76 हजार 420 रुपये आहे.
प्रश्न : असा कोणतं देश आहे, त्याच्या 3 राजधान्या आहेत ?
उत्तर : दक्षिण आफ्रिका असा एक देश आहे त्याच्या एक नाही तर तीन राजधान्या आहे. प्रिटोरिया (Pretoria) , ब्लोमफॉन्टेन (Bloemfontein) आणि केप टाउन (Cape Town) या त्याच्या राजधानी आहेत.
प्रश्न : मानवी शरीरात रक्त किती असतं ?
उत्तर : निरोगी माणसाच्या शरीराच्या वजनापैकी सुमारे 7% रक्त असतं. त्याचप्रमाणे ज्या निरोगी व्यक्तीचे वजन 70-80 किलो असतं, त्याच्या शरीरात सुमारे 5 ते 5.5 लिटर रक्त असतं.
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ?
उत्तर : भारतात 1951 मध्ये पहिल्यांदा ‘पंजाब’ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.काँग्रेसमधील फुटीमुळे येथे 20 जून 1951 ते 17 एप्रिल 1952 दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
प्रश्न : एका वर्षात किती मिनिटे असतात ?
उत्तर : 525600 मिनिटे
प्रश्न : आशियातील पहिली अणुभट्टी कोणती होती ?
उत्तर : आशियातील पहिल्या अणुभट्टीला ‘अप्सरा’ म्हणतात. हे 4 ऑगस्ट 1956 रोजी भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे कॅम्पसमध्ये बांधले गेले. BARC च्या वेबसाइटनुसार, त्याचे उद्घाटन 20 जानेवारी 1957 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं.
प्रश्न : असा कोणता प्रश्न आहे, त्याचं उत्तर नेहमी बदलत राहतं ?
उत्तर : आत्ता किती वाजले आहेत? या प्रश्नाचे उत्तर नेहमी बदलत राहतं..
प्रश्न : 500 / 2000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी RBI ला किती खर्च येतो ?
उत्तर : रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात सांगितलं आहे की, 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी सरकारला 4.18 रुपये खर्च येतो. 500 रुपयांची नोट छापण्यासाठी 2.57 रुपये खर्च येतो. तर 100 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.51 रुपये खर्च येतो.
प्रश्न : एका दिवसासाठी पंतप्रधान कोणाला करण्यात आलं होतं ?
उत्तर : फिनलँडमध्ये (Finland), फक्त 16 वर्षांच्या मुलीला “अवा मुर्तो” (Ava Murto) एका दिवसासाठी पंतप्रधान करण्यात आलं होतं. तिने अनेक मानवाधिकार मोहिमा चालवल्या होत्या.स्त्री-पुरुष समानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिने एका दिवसासाठी फिनलँडचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
प्रश्न : भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
उत्तर : श्रीनगर ते कन्याकुमारीला जोडणारा 3745 किमी लांबीचा NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे.
प्रश्न : जगातील एकमेव हिंदू राष्ट्र कोणतं ?
उत्तर – नेपाळ
प्रश्न : भारताच्या पहिल्या महिला IAS कोण होत्या?
उत्तर : अण्णा राजम मल्होत्रा.
प्रश्न : बंदुकीतून सोडलेल्या गोळीचा वेग किती असतो ?
उत्तर : बंदुकीच्या सरासरी गोळीचं स्पीड 2500 फूट प्रति सेकंद असतो. म्हणजे सुमारे 1700 mph…
प्रश्न : SC, ST आणि OBC चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : SC, ST आणि OBC चे फुल फॉर्म अनुक्रमे Scheduled Castes (SC), Scheduled Tribes (ST) आणि Other Background Classes (OBC) आहे. मराठीमध्ये त्यांना अनुक्रमे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) म्हणतात.