शेतीशिवार टीम, 23 मे 2022 :- इंधन उत्पादनांच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम पाहता केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर सरकारने घरा-घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या LPG सिलिंडरवर 200 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी देण्याची घोषणा केली.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर हे अनुदान दिले जाईल. अनुदान मिळाल्यानंतर,राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत 14.2 किलो LPG सिलिंडरची प्रभावी किंमत 803 रुपयांपर्यंत खाली येणार आहे.
लाभार्थीच्या बँक खात्यात गॅस सबसिडी :-
सध्या दिल्लीत 1,003 रुपयांना एलपीजी सिलिंडर उपलब्ध आहे. गॅस सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल जेणेकरून सिलेंडरची प्रभावी किंमत सामान्य सिलिंडरपेक्षा 200 रुपये कमी असणार आहे. याचा फायदा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे 9 कोटी लाभार्थ्यांना होणार आहे. मात्र, जून 2020 पासून सरकार गॅस सिलिंडरवर अनुदान देत आहे . त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही एलपीजी (LPG) सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावं लागले. मात्र एका सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेल्यानंतर सर्वसामान्यांना ते विकत घेणे कठीण झालं आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कसा घ्यावा :-
तुम्हालाही सरकारच्या PM उज्ज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जाणून घ्या. या योजनेबद्दल सांगायचं तर,सुरुवातीला याचा लाभ 5 कोटी महिलांना ठेवण्यात आला होता. नंतर 8 कोटी महिलांना या योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या योजनेअंतर्गत घरातील महिलांना मोफत LPG कनेक्शन दिले जाते. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कसा घ्यावा ते आपण आज जाणून घेऊया…
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत कनेक्शनसाठी तुम्हाला या आवश्यक कागदपत्रे :-
उज्ज्वला कनेक्शनसाठी e-KYC (know your customer) आवश्यक आहे.
– BPL राशन कार्ड किंवा कोणत्याही राज्य सरकारने जारी केलेले रेशन कार्ड, ज्यामध्ये तुमच्याकडे दारिद्र्यरेषेखाली असल्याचा पुरावा आहे.
– तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र आवश्यक असेल.
– बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड आवश्यक असेल.
– पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवा.
उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा :-
1) सर्वप्रथम, तुमच्या संगणकावर उज्ज्वला योजनेची अधिकृत वेबसाइट www.mylpg.in ओपन करा.
2) येथे तुम्हाला इंडेन, भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HP) चे पर्याय दिसतील.
3) तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्यायही निवडू शकता.
4) यानंतर,सर्व तपशील भरण्यासाठी काळजीपूर्वक कार्य करा.
5) याशिवाय तुम्हाला हवे असल्यास फॉर्म डाउनलोड करा.तुम्ही ते भरूनही गॅस एजन्सी डीलरकडे जमा करू शकता.
6) कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला LPG गॅस कनेक्शन देण्याचे काम केले जाईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा कोणाला मिळेल लाभ :-
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत,सरकार दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना LPG कनेक्शन देते. तसेच या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.तसेच, अर्जदार महिलेचे वय किमान 18 वर्षे असावे. याशिवाय, त्याच घरात या योजनेंतर्गत इतर LPG कनेक्शन असल्यास, त्यांना सरकारकडून या योजनेचा लाभ दिला जाणार नाही…
कनेक्शनसह,तुम्हाला काय मिळेल ?
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार मोफत LPG गॅस कनेक्शन, भरलेले सिलेंडर आणि स्टोव्ह देत आहे. एवढेच नव्हे तर शासनाकडून लाभार्थ्यांना पहिले रिफिल मोफत दिले जाते.
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा : अनेकदा उज्ज्वला योजनेची माहिती मिळविण्यासाठी लोक नाराज असल्याचे दिसून येते, परंतु सरकारने यासाठी हेल्पलाइन आणि टोल फ्री क्रमांक चालू केले आहेत.
हेल्पलाइन क्रमांक-1906
टोल फ्री क्रमांक – 18002666696