शेतीशिवार टीम : 29 मार्च 2022 : डिझेल इंजिन असलेल्या कार सामान्यतः पेट्रोल कारपेक्षा जास्त मायलेज देतात. परंतु, सीएनजी (CNG) मोडमध्ये या दोन्हीपेक्षा जास्त मायलेज उपलब्ध आहे. मात्र, आता अनेक कार कंपन्यांनी असे बरेच मॉडेल्सचे फक्त पेट्रोल व्हेरियंटमध्ये विकत आहेत. अशा परिस्थितीत लोकांकडे इंधनाचे दोनच ऑप्शन आहेत, पेट्रोल आणि सीएनजी (CNG) .
मात्र, इथे पेट्रोलचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 115.04 आणि डिझेल 99.25 वर पोहचलं आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने CNG धारकारकांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात CNG वरील VAT 13.5% वरून 3% करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता. त्यामुळे आता 3% व्हॅटच्या आधारे प्रति किलो 5.75 ते 8 रुपयाची कपात होणार आहे. (CNG gas vat in maharashtra)
अशा परिस्थितीत जास्तीत जास्त मायलेज देणारी कार हाच एकमेवचं ऑप्शन उपलब्ध आहे. त्यामुळे आपण अशाच एका कारबद्दल एका कार बद्दल जाणून घेणार आहोत, लॉन्च झाल्यापासून सर्वाधिक मायलेज देणारी कार ठरली आहे, ती म्हणजे मारुती सुझुकी Celerio (CNG) व्हेरियंट.
मारुती सुझुकीने 17 जानेवारी रोजी Celerio चं CNG व्हेरियंट लॉन्च केलं आहे. त्यानंतर ती सर्वाधिक मायलेज देणारी कार ठरली आहे. मारुतीचा दावा आहे की Celerio CNG ARAI प्रमाणित 35.60 किमी मायलेज देते. ग्राहकांमध्ये याला मोठी मागणी आहे. या सेलेरिओ CNG व्हेरियंटसाठी ग्राहकांना 6 महिन्यांपर्यंत व्हेटिंग पिरियस देत आहे. नवी Celerio लाँच झाल्यामुळे Celerio च्या एकूण विक्रीने 6,00,000 युनिट्सचा टप्पा पार केला आहे.
सेलेरिओ S-CNG जी तंत्रज्ञाना सह बाजारात दाखल करण्यात आली आहे. Celerio च्या CNG व्हेरियंटमध्ये नेक्स्ट जनरेशन ड्युअल जेट, ड्युअल VVT K-Series 1.0L इंजिन. हे 5300 rpm वर 41.7kW ची कमाल उर्जा निर्माण करतं…

पॉवर डिटेल्स :-
Celerio CNG 82.1 Nm टॉर्क निर्माण करते, जे पेट्रोल व्हेरियंट पेक्षा 89 Nm पेक्षा थोडे कमी आहे. तसेच, CNG मॉडेलला 56 hp पॉवर मिळते, जी पेट्रोल आवृत्तीच्या 64 hp पेक्षा थोडी कमी आहे. मारुती सुझुकी सेलेरियो केवळ पेट्रोल-ऑप्शनमध्ये चालवल्यास 26.68 kmpl चे प्रभावी मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंटमध्ये 1 किलोमध्ये सीएनजी (CNG) मध्ये 35.60 कि.मी मायलेज देतं.
मिळेल जास्त स्पेस :-
नवीन मारुती सुझुकी सेलेरियो मॉड्यूलर हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जी मारुती तिच्या इतर हॅचबॅक वॅगनआर, स्विफ्ट आणि बलेनोमध्ये वापरते. नवीन Celerio त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा मोठी आहे आणि त्याची लांबी 3,695 mm,, रुंदी 1,655 mm, उंची 1,555 mm आणि व्हीलबेस 2,435mm आहे. त्याची लांबी आणि उंची आउटगोइंग मॉडेल सारखीच आहे, परंतु नवीन मॉडेल 55 mm रुंद आहे तर व्हीलबेस 10 mm लांब आहे. नवीन Celerio चे ग्राउंड क्लीयरन्स 170 mm आहे, जे पूर्वीपेक्षा 5 mm जास्त आहे.
फीचर्स :-
मारुती सेलेरियो VXi CNG ही 5 सीटर सीएनजी कार आहे. Celerio VXI CNG मध्ये तुम्हाला मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हीलपॉवर, डजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिररइंजिन, स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक, ब्रेकिंग सिस्टम अलॉय, व्हीलफॉग, लाइट्स – फ्रंटपॉवर, विंडो रीअरपॉवर, विंडो फ्रंटव्हील, कव्हर बॅगर पॉवर यांसारखे फीचर्स मिळतात.
सेफ्टी फीचर्स :-
नवी मारुती सुझुकी सेलेरियोच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड सेन्सिटिव्ह डोअर लॉक आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी हिल होल्ड असिस्ट यांचा समावेश आहे. एकूणच, नवीन Celerio 12 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह येते. मारुती सुझुकीचा दावा आहे की, नवीन सेलेरियो सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करते जसे की फ्रंटल ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी संरक्षण…
कलर ऑप्शन :-
मारुती सेलेरियो 6 मोनोटोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, सॉलिड फायर रेड, स्पीडी ब्लू आणि कॅफिन ब्राउन यांचा समावेश आहे.
किंमत :-
Celerio S-CNG फॅक्टरी फिट CNG कारची VXi मॉडेल ची किंमत रु. 6.58 लाख (Ex-showroom) आहे. दुसरीकडे, जर तुम्ही फक्त Celerio पेट्रोल व्हेरियंट च्या किमतीबद्दल पाहिलं तर त्याची किंमत 4.99 लाख रुपये ते 6.94 लाख रुपये (Ex-showroom) आहे.