आता Maruti Suzuki ची होणार धमाकेदार एंट्री, 1 चार्जवर ‘ही’ इलेक्ट्रिक SUV येणार मुंबई टू पुणे रिटर्न !
शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. अलीकडील मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही ऑटोमेकर्स इलेक्ट्रिक मध्यम आकाराच्या SUV वर संयुक्तपणे काम करत आहेत नवीन मारुती इलेक्ट्रिक एसयूव्ही सुझुकीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये तयार केली जाणार आहे.
नवीन मारुती इलेक्ट्रिक कार नवीन, फ्यूचरिस्टिक डिजाइनसह मार्केटमध्ये येणार असून सध्याच्या IC इंजिन असलेल्या वाहनांपेक्षा वेगळे असेल. हे स्केटबोर्ड 27PL प्लॅटफॉर्मवर तयार केलं जाणार असून जे टोयोटाच्या 40PL ग्लोबल आर्किटेक्चरमधून घेतलं आहे. टोयोटाच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी हेच आर्किटेक्चर वापरले जाणार असलं तरी त्याची स्टाइलिंग मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी असेल. मारुती आणि टोयोटाच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नाव मारुती सुझुकी YY8 हे असणार आहे.
या वाहनांशी थेट होणार स्पर्धा…
नवीन मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV क्रेटापेक्षा मोठी असणार आहे. क्रेटाची लांबी 4300 मिमी, रुंदी 1790 मिमी आणि उंची 1620-1635 मिमी आहे. मारुतीची नवीन इलेक्ट्रिक कार MG ZS EV सारखी मोठी असेल. नवीन EV मध्ये 2700mm लांब व्हीलबेस असेल. त्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 4275 मिमी, 1880 मिमी आणि 1640 मिमी असेल…
बॅटरी / रेंज ;-
मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV 2WD (Two-wheel drive) आणि AWD (All-wheel drive) कॉन्फिगरेशनसह ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. कंपनी त्यात 48kWh किंवा 59kWh चा बॅटरी पॅक देऊ शकते, जे एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 400 किमी ते 500 किमीची रेंज देऊ शकते.
किंमत :-
नवीन मारुती इलेक्ट्रिक SUV ची किंमत 13 ते 15 लाखांच्या दरम्यान असू शकते. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्या इलेक्ट्रिक कार – Tata Nexon EV – पेक्षा ती स्वस्त असणार आहे, Tata Nexon EV ची किमत रु.14.29 लाख ते रु.16.90 लाख (Ex-showroom) किमती आहेत.