शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : मारुती अल्टो 800 (Alto 800) ही कार ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीत पडणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. कमी किंमत, उत्तम मायलेज, आणि परवडणारी असल्याने लोकांना ती फॅमिली कार म्हणून आवडली आहे.
त्यामुळे आता आपण मारुती अल्टो 800 साठी 50000 रुपये डाउन पेमेंट दिल्यास, किती EMI दिला जाईल याची माहिती देऊ. यासोबतच त्याचे फीचर्स, किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घेऊयात…
कशी आहे मारुती (Alto 800) :-
या जबरदस्त बजेट कारला BS6 नॉर्म्ससह सुसज्ज 0.8 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. सीएनजी (CNG) मोडवर चालणारे हे इंजिन 41 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क देतं. मारुती अल्टो 800 (Alto 800) च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Android Auto आणि Apple CarPlay शी कनेक्ट केली जाऊ शकते. यात कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो देखील मिळतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रायव्हर साइड एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस विथ ईबीडी यांसारखे फीचर्स देण्यात आली आहेत.
मारुती अल्टो 800 किंमत (Maruti Alto 800 price) :-
मारुती अल्टो 800 ची किंमत रु. 3.25 लाख (Ex-showroom) पासून सुरू होते आणि रु. 4.95 लाखांपर्यंत जाते. मारुती अल्टोच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार पेट्रोलवर 22.05 kmpl आणि CNG वर 31.59 kmpl मायलेज देते.
मारुती अल्टो 800 EMI :-
जर तुम्ही 50000 रुपयांचे डाउन पेमेंट भरून मारुती अल्टो 800 STD पेट्रोल कार खरेदी केली,तर कार ईएमआय (EMI) कॅल्क्युलेटरनुसार, 5 वर्षांसाठी या कारची ईएमआय 9.8% बँक कर्जानुसार 6551 रुपये प्रति महिना असेल. यासोबतच फायनान्स मिळाल्यावर तुम्हाला 5 वर्षात सुमारे 83,296 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.
Maruti Alto 800 वर उपलब्ध असलेले कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर देखील तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असल्याने यात बदल होऊ शकतो.