शेती शिवार टीम, 12 मे 2022 :- कोणालाही वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त मिळत नाही !, ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल….असाच एक प्रकार बिहारमधील मधुबनी पोलीस स्टेशन हद्दीतील छौराही गावातून समोर आला आहे. चौराही गावात राहणारा मोहम्मद झियाउद्दीन क्षणात करोडपती झाला, पण काही तासांतच तो रोडपती झाला. खरं तर, 30 वर्षीय तरुण मोहम्मद झियाउद्दीनने Dream11 मध्ये संघ बनवून एक कोटी रुपये जिंकला पण त्याच्या हातात एकही रुपया आला नाही…
1 कोटी 139 रु. बक्षीस जिंकलं…
चेन्नई येथील एका कंपनीत मजूर असलेल्या मोहम्मद झियाउद्दीनने सांगितले की, तो 28 एप्रिल रोजी ड्रीम इलेव्हनमध्ये T20 स्पर्धा खेळत होता. त्या दिवशी ड्रीम इलेव्हनच्या T20 सामन्यात 30 लाख 76 हजार 923 लोकांनी भाग घेतला होता.
Dream11 वर सातत्याने टीम निवडत होता, अन् त्या दिवशी त्याला सहाव्या वेळी यश मिळालं आणि तो पहिला विजेता ठरला. विजेता बनण्यासोबतच त्याला 1 कोटी 139 रुपयांचे बक्षीस मिळालं. यासह, टॅक्स कपात केल्यानंतर, त्यांच्या वॉलेट खात्यात 70 लाख 167 रुपये 50 पैसे आले.
करोडो रुपये जिंकूनही मिळाले नाही पैसे…
मोहम्मद झियाउद्दीनच्या म्हणण्यानुसार, केवायसी (KYC) नसल्यामुळे, वॉलेटमधून पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होऊ शकले नाहीत. 1 मे रोजी त्याला ओटीपी (OTP) आला आणि त्यानंतर 9673485*** या अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. या भामट्याने त्यांच्याकडून (OTP) ओटीपी घेतला.
यानंतर पुन्हा 8260881***वरून अनेक कॉल आले पण झियाउद्दीनने तो नंबर ब्लॅकलिस्ट केला. तो नवीन बँक खाते उघडणार असतानाच त्याचा मोबाईल बंद झाला. मोबाईल ऑन केल्यानंतर मोबाईलमध्ये डेटा नव्हता. OTP मागितल्यानंतर काही तासांतच सायबर गुन्हेगारांनी त्याच्या खात्यातून सर्व पैसे काढून घेतले.
घरी परतण्यासाठीही शिल्लक नव्हते पैसे
झियाउद्दीन म्हणला की, जेव्हा त्याने OTP शेअर केला तेव्हापासून मोबाईल बंद होता. 2 मे रोजी मोबाईल चालू असताना Gmail लॉगिनसाठी विचारत होता, त्यांनी लॉगिनसाठी पासवर्ड टाकला असता तो चुकीचा दाखवत होता.
त्यानंतर त्याने दुसरा जीमेल आयडी तयार करून मोबाईल उघडला, जुना डेटा सापडला नाही. 2 मे रोजी त्याच्या खात्यातील डिटेल्स पाहिल्यावर त्याच्या खात्यातून सर्व पैसे रिकामे झाले. त्याच्याकडे इतके पैसेही शिल्लक नव्हते की तो त्याच्या घरी परत येऊ शकेल. त्याच्या पत्नीने त्याला पैसे पाठवल्याने तो घरी पोहचला.
पोलिसांत गुन्हा दाखल…
गुन्हा नोंदवल्यानंतर, पोलिसांनी तपासाला सुरवात केली,मोहम्मद जियाउद्दीनचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आहे, त्यांचे संपूर्ण कुटुंब झोपडीत राहतं. मोहम्मद झियाउद्दीन चेन्नईतील एका लेदर बॅग बनवणाऱ्या कंपनीत काम करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी गावातच शेळीपालनाचे काम करते.
Dream11 मध्ये जिंकल्यानंतर, त्याला वाटले की, आपली आर्थिक समस्या संपली आहे परंतु नशिबाने त्याला साथ दिली नाही, असचं म्हणावं लागेल, करोडो रुपये जिंकूनही तो करोडपती होऊ शकला नाही. त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार मधुबनी एसपीकडे केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.