शेती शिवार टीम, 12 मे 2022 :- टाटा मोटर्सने आपली मोस्ट अवेटेड Nexon EV Max इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. एका चार्जवर त्याची रेंज 437Km असणार आहे असा कंपनीचा दावा केला आहे. ही EV कार 4 चार्जर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 17.74 लाख रुपये आहे. तसे, एवढी दमदार रेंज देऊनही, Tata Nexon EV Max ही देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार ठरली नाहीये…

त्याऐवजी टॉप-5 च्या लिस्ट मध्ये ती चौथ्या क्रमांकावर आहे. होय, ही वेगळी बाब आहे की कंपनीने या नवीन रेंजसह 99.30 लाखांची Mercedes-Benz EQC आणि 20.99 लाखांची MG ZS EV इलेक्ट्रिक कारला मागे टाकलं आहे. चला तर मग आपल्या देशातील सर्वाधिक रेंज देणाऱ्या टॉप 6 इलेक्ट्रिक कार बद्दल जाणून घेऊया…

1. ऑडी ई-ट्रॉन (Audi e-tron) : रेंज 484Km

ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात जुलै 2021 मध्ये लॉन्च झाली होती. त्याची तीन मॉडेल्स E-Torn 50, E-Torn 55 आणि E-Torn Sportback मध्ये येतात. या व्हेरियंटच्या एक्स – शोरूम किंमत अनुक्रमे 99.99 लाख रुपये, 1.16 कोटी रुपये आणि 1.18 कोटी रुपये आहेत. ई-टॉर्न 50 313bhp पॉवर आणि 408Nm टॉर्क निर्माण करणाऱ्या मोटरसह 71kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे.

एका चार्जवर याची रेंज 379 किमी आहे. ई-टॉर्न 55 आणि ई-टॉर्न स्पोर्टबॅक 408bhp पॉवर आणि 664Nm टॉर्क मोटर्ससह 91kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहेत. एका चार्जवर त्यांची रेंज 484 किमी आहे.

2. जग्वार (Jaguar I Pace) : रेंज 470Km

जग्वारची (Jaguar) ही इलेक्ट्रिक कार 90kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते. त्याची मोटर 400bhp पॉवर आणि 696Nm टॉर्क जनरेट करते. एका चार्जवर त्याची रेंज 470 KM आहे. ही इलेक्ट्रिक कार इतकी पॉवरफुल आहे की ती फक्त 4.8 सेकंदात 0 ते 100kmph चा वेग पकडते. त्याचा टॉप स्पीड 200kmph इतका आहे. कारची बॅटरी 100kW फास्ट चार्जरने 45 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते. तर ती 7kW AC चार्जरसह 10 तासांमध्ये चार्ज होते. Jaguar I Pace S, SE आणि HSE व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे.

3. हुंडई कोन फेसलिफ्ट (Hyundai Kona facelift) : रेंज 452Km

दक्षिण कोरिया कंपनीनेही आपलं पहिलं इलेक्ट्रिक मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलं आहे. हे कंपनीने 2019 मध्ये लॉन्च केलं होतं. ही कार तुम्ही प्रीमियम आणि प्रीमियम ड्युअल टोन व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता.

त्याची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 23.79 लाख आणि 23.97 लाख रुपये आहे. कोना इलेक्ट्रिक कारमध्ये 39.3kWh बॅटरी पॅक आहे. त्याची मोटर 136bhp पॉवर आणि 395Nm टॉर्क जनरेट करते. ती 9.7 सेकंदात 0 ते 100kmph चा वेग पकडते. ARAI-सर्टिफाइड रेंज 452km पर्यंत रेंज देते.

4. Tata Nexon EV Max : रेंज 437Km

Tata Motors ने त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Nexon EV चे मॅक्स (Max) व्हेरियंट लॉन्च केलं आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 17.74 लाख रुपये आहे. ही कार 40.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. एका चार्जवर त्याची ARAI सर्टिफाइड रेंज 437Km आहे. कारमध्ये 105 kW ची मोटर आहे जी 143PS ची पॉवर जनरेट करते.

यात 3.3 kW चार्जर किंवा 7.2 kW AC फास्ट चार्जर पर्याय आहेत. कंपनीचा दावा आहे की Nexon EV Max कोणत्याही 50 kW DC फास्ट चार्जरने केवळ 56 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज होते.

5. MG ZS EV : रेंज 419Km

भारतात MG ZS एक्स-शोरूम किंमत 20.99 लाख ते 24.58 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक SUV मध्ये 44.5kWh चा बॅटरी पॅक आहे. त्याची मोटर 143bhp पॉवर आणि 353Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. एका चार्जवर त्याची रेंज 419 किमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. ती 8.5 सेकंदात 0 ते 100kmph चा वेग पकडते. या फास्ट डीसी चार्जरच्या मदतीने 50 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते. तसेच, एसी चार्ज केल्यावर, ते 6 ते 8 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते.

6. मर्सिडीज – बेंझ EQC : रेंज 414Km

Mercedes-Benz ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपली लक्झरी इलेक्ट्रिक कार EQC लाँच केली होती. त्याची एक्स-शोरूम किंमत 99.30 लाख रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, एका चार्जवर त्याची रेंज 370km ते 414km आहे.

यात दोन मोटर्स आहेत ज्या 408bhp पॉवर आणि 765Nm टॉर्क जनरेट करतं. यात 7.5kW वॉल-बॉक्स चार्जर आणि 50kW DC फास्ट चार्जर मिळतो. ही 10 तास आणि 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होते. ती फक्त 5.1 सेकंदात 0 ते 100kmph चा वेग पकडते. तसेच या कार चा टॉप स्पीड 180kmph आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *