मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या महिन्यात अधिकृतपणे आपली न्यू SUV Grand Vitara लॉन्च करणार आहे. या SUV चे फीचर्स, टेक्नॉलॉजी आणि व्हेरियंट इत्यादींबद्दल सर्व डिटेल्स आधीच उघड झाले असले तरी, त्याची किंमत अद्याप उघड झालेली नाही. नुकतेच या SUV चे बुकिंगही सुरू झालं असून, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या SUV च्या 53,000 हून अधिक युनिट्सचे बुकिंगही झालं आहे. प्रचंड मागणीमुळे, या SUV च्या विविध व्हेरियंटसाठी व्हेटिंग पिरियड 5 महिन्यांहून अधिक झाला आहे.

मारुती सुझुकीकडे सध्या 4.17 लाख वाहनांच्या डिलिव्हरीसाठी प्रलंबित ऑर्डर आहेत, जे एका महिन्यापूर्वी 3.87 लाख युनिट्स होत्या. मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत जाहीर होण्याआधीच 53,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळवलं आहे, हे स्पष्ट आहे की, या सणासुदीच्या हंगामात कार डिलिव्हरी करण्यासाठी कंपनीवर अधिक दबाव असणार आहे.

कंपनीने हे देखील उघड केले की, त्यांना स्ट्रांग – हाइब्रिड व्हेरियंटसाठी चांगली मागणी दिसत आहे, एकूण बुकिंगपैकी 41% किंवा 22,000 युनिट्स या हाइब्रिड व्हेरियंटसाठी आहेत.

ग्रँड विटारा एकूण 6 व्हेरियंटमध्ये येत असून ही SUV कंपनीच्या प्रीमियम नेक्सा शोरूममधून विकली जाणार आहे. ही SUV टू पॉवरट्रेन ऑप्शनमध्ये उपलब्ध असून यामध्ये एक 1.5-लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि दुसरं म्हणजे 1.5-लीटर ड्युअल VVT पेट्रोल इंजिन.

ट्रान्समिशनमध्ये इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड ट्रिमसाठी E-CVT आणि पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड अँटोमॅटिक किंवा प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड ट्रिममध्ये 5 -स्पीड मॅन्युअल समाविष्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, ते सेगमेंटमध्ये सर्वोत्तम मायलेज देते, त्याचे VVT पेट्रोल इंजिन 21.11Km आणि हायब्रिड व्हेरियंट 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

सिग्मा (Sigma) हा ग्रँड विटाराचा सर्वात स्वस्त व्हेरियंट आहे आणि या व्हेरियंटमध्ये एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), एलईडी पोझिशन लॅम्प, टर्न इंडिकेटरसह ORVM, शार्क फिन अँटेना, ड्युअल-टोन ब्लॅक आणि सिल्व्हर अँक्सेंटसह बोर्डो इंटीरियर आणि ब्लॅक फॅब्रिक आणि डोअर आर्मरेस्ट मिळेल. 4.2 इंच TFT कलर इन्फॉर्मेशन डिस्प्ले, स्टीयरिंग माउंटेड, ऑडिओ कमांड्स, कीलेस एंट्री, क्रोम इनडोअर डोअर हँडल, स्पॉट मॅप लॅम्प (रूफ फ्रंट), स्टोरेजसह फ्रंट स्लाइडिंग आर्मरेस्ट, पुश स्टार्ट / स्टॉप बटण यांसारखे फीचर्स मिळतील.

मिड साईझ SUV म्हणून, मारुती ग्रँड विटारा बाजारात ह्युंदाई क्रेटाला सर्वात मोठी स्पर्धा देईल. ही SUV कंपनीने टोयोटाच्या मदतीने तयार केली असून तिची टेक्नॉलॉजी अलीकडेच सादर करण्यात आलेल्या टोयोटा हायराइडरसारखी (Toyota Hyryder) आहे.

टोयोटाने काही दिवसांपूर्वी Hyryder च्या हायब्रिड आणि पेट्रोल टॉप व्हेरियंटची किंमत जाहीर केली होती, ज्यामध्ये हायब्रीड व्हेरियंटची किंमत 15.11 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 18.99 लाख रुपये (Ex-showroom) आहे. तसेच, पेट्रोल टॉप मॉडेलची किंमत 17,09,000 रुपये आहे. मारुती ग्रँड विटारा यापेक्षा किंचित स्वस्त असू शकते असं मानलं जातं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *