शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : सध्या देशभरात कोरोनामुळे दैनंदिन प्रकरणात सतत चढ-उतार सुरू आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशात कोरोनाच्या डेल्टा व्हॅरीएंटचा धोका अजूनही कायम आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती अजूनही आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की ज्या प्रकारे लोकांचे लसीकरण झपाट्याने केले जात आहे, त्यामुळे हा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करणार नाही अशी अपेक्षा आहे, तरीही लोकांनी तिसऱ्या लाटेबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की कोविड’च्या पहिल्या दोन लाटेप्रमाणे, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांमध्ये तिसऱ्या लाटेचा धोकाही जास्त असू शकतो.
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता, आरोग्य तज्ञ सर्व लोकांना त्यांच्या आहारात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला देतात. आयुर्वेद तज्ञांच्या मते, अशी अनेक औषधे आहेत आणि आयुर्वेदाचे वरदान आपल्या घरात आहेत, ज्यांचे नियमित सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया :-
1. तूप :-
आयुर्वेदात तुपाचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, तुप मधील पौष्टिक मूल्य शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच डोळ्यांचं आरोग्य आणि त्वचेसाठीही तूप अत्यंत फायदेशीर मानले जाते. तुपात विटामिन ए, के, ई, ओमेगा-3 आणि ओमेगा-9 सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासोबतच पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
2.खजूर :-
आयुर्वेदात व्हिटॅमिन-सी आणि आयर्न ने समृद्ध असं खजूर खूप फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती आणि श्वसनाच्या समस्या बरे करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातं, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व लोकांनी रोज खजुराचे सेवन केले पाहिजे. दूध आणि खजूर यांचे विशेष फायदे आहेत.
3.तुळशीची पाने :-
तुळशीची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जातात. आयुर्वेदाबरोबरच विज्ञानानेही तुळशीचे आरोग्यदायी फायदे सिद्ध केले आहेत. तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे फायटोकेमिकल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट संयुगे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतात. व्हिटॅमिन-ए, सी सोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक देखील यामध्ये आढळतात, ज्याचे शरीरासाठी विशेष महत्त्व आहे.
4. साखरेऐवजी गूळ खा :-
आरोग्य तज्ञ निरोगी शरीरासाठी साखरेचे सेवन टाळण्याचा सल्ला देतात. गुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक आणि सेलेनियम सारख्या मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, ज्याचे सेवन शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. गुळात आढळणारे अँटीऑक्सिडंट शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील गुळामध्ये आढळतात, हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी विशेषतः फायदेशीर आहेत.