शेतीशिवार टीम, 1 जानेवारी 2022 : नववर्षानिमित्त केंद्र सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण केलं जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, शनिवार म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून कोविन पोर्टल (CoWIN Portal) किंवा अॅप्सवर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी रजिस्ट्रेशन विंडो सकाळी 10 वाजता उघडली आहे. तर लसीकरणही सोमवारपासून सुरू होणार आहे.
अलीकडेच पीएम मोदींनी 3 जानेवारीपासून 15-18 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. विशेष बाब म्हणजे किशोरवयीन मुलांकडे आधार कार्ड नसलं तरी ते फक्त दहावीच्या ओळखपत्राने सुद्धा लसीकरणासाठी त्यांचा स्लॉट बुक करू शकतात.
मुंबई महानगर पलिकेने ही लसीकरणासाठी नव्या गाईडलाईन्स जरी केल्या आहेत. त्यामध्ये 2007 व त्यापूर्वी जन्मलेली मुले लसीकरणसाठी पात्र असणार आहे. ते मुलं स्वतःच्या मोबाईल क्रमांकाने CoWIN Portal वर रजिस्ट्रेशन करू शकतात…
लसीकरण लवकर करा, डॉक्टरांचं आवाहन…
कोरोनाव्हायरस आजाराच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने त्यांचे संरक्षण करण्यासाठी, या वयोगटातील आपल्या मुलांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन डॉक्टरांनी पालकांना केलं आहे. डॉ. बिष्णू पाणिग्रही, ग्रुप हेड, मेडिकल स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स, फोर्टिस हेल्थकेअर ग्रुप, म्हणाले, “व्हायरसचा ओमायक्रोन (Omicron) फॉर्म लोकांना संक्रमित करत आहे आणि तो पसरत आहे, परंतु ज्यांना लसीकरण करण्यात आलं आहे ते मोठ्या प्रमाणात
Asymptomatic (म्हणजे त्यांच्यात कुठलेही लक्षणे आढळले नाहीत) ज्यांनी लसीकरण केलेलं नाही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची अधिक शक्यता आहे. म्हणून, मी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करतो, आणि पात्र असल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याचं आवाहन करतो.
कसं कराल रजिस्ट्रेशन :-
प्रथम, आरोग्य सेतू अँप किंवा Cowin.gov.in वर भेट देऊन तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता. जर त्यांनी आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा.
नवीन रजिस्ट्रेशन साठी, तुम्हाला ID टाइप, फोन नंबर आणि तुमचे पूर्ण नाव प्रविष्ट करावे लागेल.
यानंतर, मुलाचे लिंग आणि वय येथे प्रविष्ट करा.
यानंतर मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येईल.
त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्राचा पिन कोड (PIN code) टाकून लसीकरण केंद्रांच्या यादीतून केंद्र निवडू शकता..
यानंतर, तुम्हाला तुमचा लसीकरण स्लॉट त्या केंद्रावर तारीख आणि वेळेसह बुक करावा लागेल.
ज्या मुलांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा नाही, त्यांनी त्यांचे ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्राला भेट द्या आणि तेथे ऑन-साइट लसीचा स्लॉट बुक करून भेटू शकतो…