शेतीशिवार टीम, 1 जानेवारी 2022 : आजपासून नवीन वर्ष 1 जानेवारी 2022) सुरू झालं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून सर्वांच्या खिशावरचा भार वाढणार आहे. आजपासून बूट – चप्पल आणि एटीएम रोख व्यवहारांसह (ATM cash transaction) अनेक गोष्टी महाग होत आहेत. तर आज एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.
ATM मधून पैसे काढणं महागणार :-
बँक ग्राहकांना एटीएममधून रोख व्यवहारांसाठी (ATM cash withdrawal limit per transaction) आधी जे पैसे भरले जात होते त्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. 1 जानेवारी 2022 पासून ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. जूनमध्येच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 1 जानेवारी 2022 पासून विनामूल्य मासिक मर्यादेपेक्षा जास्त रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढवण्याची परवानगी दिली. Axis Bank ने सांगितले की, “RBI च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, 01-01-22 पासून Axis बँक किंवा इतर बँक ATM मध्ये मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार शुल्क ₹21 + GST वाढ होणार आहे.
आजपासून शूज – चप्पल महागणार :-
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत काल निर्णय घेण्यात आला की 1 जानेवारी 2022 पासून सर्व पादत्राणांवर ₹12% GST लागू होईल, या पादत्राणांची किंमत काहीही असो. म्हणजेच चपला 100 रुपयांचा असो वा 1000 रुपयांचा, सर्वांवर 12% दराने जीएसटी आकारला जाणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे नवीन शुल्क :-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने जाहीर केलं आहे की, त्यांनी 1 जानेवारी 2022 पासून शाखेतील रोख पैसे काढणे आणि ठेवींवरील शुल्क सुधारित केले आहे. नवीन नियमानुसार, 1 जानेवारी 2022 नंतर, जर IPPB खातेधारकाने निर्धारित मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर पैसे जमा केले किंवा काढले तर त्याला अधिक शुल्क भरावे लागेल.इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक हा भारतीय पोस्टचा एक विभाग आहे, जो पोस्ट विभागाच्या मालकीचा आहे.
एलपीजी सिलिंडर झालं स्वस्त :-
नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर करण्यात आली आहे. IOCL च्या मते, 1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 102 ते 1998.5 पर्यंत खाली आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत दिल्लीकरांना 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 2101 रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 2131 रुपये, मुंबईत 1948.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
खाद्यतेलाच्या दरात 10 ते 15% कपात करण्यात आली आहे.