शेतीशिवार टीम, 5 मार्च 2022 : फेब्रुवारी महिन्यामध्ये कार विक्रीत ओवरऑल 1.86 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, अनेक वाहनांची ताबडतोड विक्री झाली आहे. तसेच मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली तर टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली.तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 7 सीटर कारबद्दल आपण जाणून घेउयात…
‘ही’ 7 सीटर कार ची झाली झपाट्याने विक्री :-
मारुती अर्टिगा (Maruti Ertiga) ही पुन्हा एकदा फेब्रुवारी 2022 मध्ये देशात सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली आहे. गेल्या महिन्यात 11,649 मोटारींची विक्री झाली. टॉप 10 च्या लिस्ट मध्ये Maruti Ertiga सहाव्या स्थानावर आहे.
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत या वाहनाने 19.18% वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण 9,774 युनिट्सची विक्री झाली. यादीतील दुसरी 7 सीटर कार महिंद्रा बोलेरो आणि तिसरी Maruti Echo ठरली आहे.
मारुती अर्टिगाचे (Maruti Ertiga) फीचर्स :-
Maruti Ertiga ची किंमत 8.12 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.85 लाख रुपये (Ex-showroom) पर्यंत जाते. मारुती एर्टिगा 1.5-लीटर पेट्रोल इंजिन (105PS/138Nm) सह येते, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेले आहे.
हे पेट्रोलसोबतच CNG ऑप्शनसह येते. मायलेजबद्दल बोलायचं झालं तर, पेट्रोल इंजिन 19.01kmpl आणि CNG पर्याय 26.08km / kg मायलेज देतंय.

या मध्ये प्रोजेक्टर हेडलाइट्स,फॉग लॅम्प्स,LED tail lamps,15-इंच चाके, 7-इंच इंफोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो आणि कारप्ले आणि Push-button स्टार्ट/स्टॉप यांसारखे फीचर्स दिले आहेत.
Ertiga ला Ventilated फ्रंट कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोलसह मागील एसी व्हेंट्स आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील मिळतो. मारुती 7-सीटर MPV टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, किया केरेन्स आणि महिंद्रा मराझो यांच्याशी थेट स्पर्धा करताना दिसून येत आहे.