शेतीशिवार टीम, 5 मार्च 2022 : युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतावरही परिणाम होत आहे.तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या 10 दिवसांनंतर भारतात यांच्यातील युद्धामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. तसेच युद्धामुळे अन्नधान्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.आज खाद्यतेलाच्या किमती 20 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे.
भारतात जवळपास 70% सूर्यफूल तेल युक्रेनमधून आयात केलं जातं. तसेच आपल्या भारतात मोहरीचे तेलात वाढ झाली असून ते 260 रुपये प्रति लिटर पर्यंत वाढलं आहे. सूर्यफूल तेल हे 160 ते 236 रुपये आणि पामतेल 140 ते 175 रुपये रेट आहे. हे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेली 4 मार्चची आकडेवारी आहे.
तूर 128 रुपये किलो :-
डाळींबद्दल बोलायचे झाले तर तूर डाळ 128 रुपये किलोने विकली जात आहे. 4 मार्च रोजी कर्नालच्या किरकोळ बाजारात तूर डाळ 128 रुपये प्रति किलो होती, उडीद डाळ रेवामध्ये 73 रुपये किलो तर एर्नाकुलममध्ये 149 रुपये किलोने विकली जात होती. मूग डाळ बोडेलीमध्ये 80 रुपये, कोझिकोडमध्ये 137 रुपये, तर सर्वात स्वस्त मसूर डाळ होशंगाबादमध्ये 66 रुपये आणि बंगळुरूमध्ये सर्वात महाग 135 रुपये आहे.

पेट्रोल 10 ते 12 रुपयांनी महागणार ?
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून इंधनाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, आता पुढील 11 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 रुपयांनी वाढ होऊ शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

काय आहे अहवालात :-
ICICI सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालानुसार, किरकोळ विक्रेत्यांना खर्च वसूल करण्यासाठी 16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 12 रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे. तेल कंपन्यांचे मार्जिन जोडल्यास प्रति लिटर 15.1 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, ‘राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील आठवड्यात संपल्यानंतर त्यानंतर दररोज इंधनाचे दर वाढू शकतात, असा अंदाज आहे.