महाअपडेट टीम 20 डिसेंबर 2021:- नवं वर्ष 2020 मध्ये नवीन कामगार कायदे लागू होण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारापासून त्यांच्या सुट्ट्या आणि कामाच्या तासांमध्ये बदल होऊ शकतो.

त्यानुसार आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी असणार आहे. यामध्ये कामाचे तास आठ ऐवजी 12 असतील. मात्र, आठवड्यातील 48 तास कामाचा नियम लागू राहणार असल्याचेही कामगार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

या कायद्यांसाठी 13 राज्यांनी मसुदा तयार केली असून नवीन कामगार कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्याचा परिणाम कार्यालयात काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांपासून ते गिरण्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांपर्यंत होणार आहे.

केंद्राने दिलं अंतिम स्वरूप :-

मजुरी, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीवर चार कामगार संहिता पुढील आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे. केंद्राने या संहिता अंतर्गत नियमांना अंतिम रूप दिलं आहे. आणि आता राज्यांना त्यांचे स्वतःचे नियम बनवावे लागणार आहे \, कारण श्रम हा समवर्ती यादीतील विषय आहे. पुढील आर्थिक वर्षात चार कामगार संहिता लागू होण्याची शक्यता आहे, असे केंदीय कामगार विभागानं सांगितलं आहे.

या कायद्यासाठी मोठ्या संख्येने राज्यांनी मसुदा नियमांना अंतिम रूप दिलं आहे, असे ते म्हणाले. केंद्राने फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितांसाठी मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु कामगार हा समवर्ती विषय असल्याने, केंद्राने राज्यांनी एकाच वेळी त्याची अंमलबजावणी करावी असे वाटते.

चार दिवस काम, तीन दिवस सुटी :-

कामगार कायद्याप्रमाणे सध्या आठवडाभरात कामाचे किमान 48 तास भरणे आवश्यक आहे.. त्यानुसार, रोज 8 तास असे 6 दिवस काम केल्यावर एक दिवसाची सुटी मिळते. मात्र, नव्या कायद्यानुसार, रोज 12 तास काम केल्यास 4 दिवस ड्युटी नि 3 दिवसांची सुटी मिळेल..

हातात पगार कमी पण PF जास्त :-

तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic) आणि भविष्य निर्वाह निधी (PF) मोजण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांच्या (PF) खात्यातील योगदान दरमहा वाढेल पण हातात असलेला पगार (Take home) कमी होणार आहे. नवीन कामगार संहितेत, भत्ते 50% मर्यादित करण्यात आले आहेत. यामुळे मूळ वेतन (Basic) कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या 50% होईल.

PF ची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारावर केली जाते ज्यात मूळ वेतन आणि महागाई भत्ता समाविष्ट असतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन दरमहा 50 हजार रुपये असेल तर त्याचे मूळ वेतन 25 हजार रुपये आणि उर्वरित 25 हजार रुपयांमध्ये भत्त्यांचा समावेश असेल. मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे कर्मचार्‍यांच्या वतीने पीएफ (PF) अधिक कापला जाईल आणि कंपनीचे योगदानही वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *