Take a fresh look at your lifestyle.

180KM रेंज ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च | पहा ‘हे’ जबरदस्त फीचर्स अन् किंमत…

1

शेतीशिवार टीम : 25 मार्च 2022 : ओकिनावा ऑटोटेक (Okinawa Autotech), भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक प्रॉडक्टिव्ह कंपनीने गुरुवारी आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा ओखी-90 (Okinawa Okhi-90) लाँच केली आहे. ग्राहकांसाठी ‘द रिस्पॉन्सिबल चॉईस’ म्हणून ओळखली जाणारी Okhi 90 ही मोटरसायकल आणि स्कूटरचे एक अद्भुत मिश्रण आहे जे गाव – शहरवासीयांच्या विविध गरजा पूर्ण करते. स्कूटरच्या आरामदायी फीचर्स मध्ये रुंद ग्रिपवाले टायर आणि मोठी आरामदायी सीट समाविष्ट आहे, ज्यामुळे ती भारतीय कुटुंबांसाठी एक चांगली निवड ठरू शकते.

बुकिंग झाली सुरु…

Okinawa ची Okhi-90 देशभरातील ओकिनावा अधिकृत डीलर्स आणि गॅलेक्सी स्टोअर्समधून खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने Okinawa Okhi 90 चे https://okinawascooters.com/ बुकिंग ही सुरु केले आहे.

सगळ्यात आरामदायी स्कूटर आणि फीचर्स पहा…

याचे 16-इंचाचे स्टायलिश अँल्युमिनियम अलॉय व्हील्स केवळ आकर्षक दिसत नाहीत तर एकूण रायडिंग अनुभवात भर कमालीची भर घालत आहे. विशेषतः खडबडीत रस्त्यांसाठी व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही दुचाकी अतिशय उपयुक्त आहे. त्याची एलईडी हेडलाइट Okinawa ब्रँडच्या लोगोपासून प्रेरित आहे.

रात्रीच्या वेळी अंधुक प्रकाश असलेल्या भागात बाईक चालवताना अधिक चांगलया रायडींग अनुभवासाठी संवेदनशील लाइट सेन्सर्ससह बसवलेले आहेत. Ockhi-90 ला जलद आणि सुलभ स्टार्टअपसाठी नॉब-स्टाइल चा ऍटोमॅटिक कीलेस स्टार्ट मिळते.

Okinawa सध्या भारतीय इलेक्ट्रिक बाईक बाजारात अव्वल स्थानावर आहे. हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर रेंजमधील ओला एस1 (Ola S1) आणि सिंपल वन (Simple One) सारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी कंपनीला नव्या इलेक्ट्रिक स्कूटरकडून खूप अपेक्षा आहेत. EV निर्मात्याने अलीकडेच राजस्थानमध्ये आपलं दुसरं इलेक्ट्रिक वाहन प्रॉडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली. Okhi 90 हे या प्लांटमध्ये तयार करण्यात येणार्‍या फ्लॅगशिप मॉडेलपैकी एक असणार आहे.

बॅटरी, ड्राइव्ह मोड आणि स्पीड…

Okinawa Okhi – 90 ही भारतीय रस्त्यांवरील हाय-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात 3800 वॅटची मोटर असून यात रिमोव्हेबल 72V 50 Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या स्कूटरला इको आणि स्पोर्ट्स असे दोन राइडिंग मोड मिळतात. आश्चर्याची बाब म्हणजे ही स्कूटर केवळ 10 सेकंदात 0 ते 90 किमी प्रतितास वेग पकडते. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही इको मोडमध्ये 55 ते 60 किमी प्रतितास आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 85 ते 90 किमी प्रतितास वेगाने चालवू शकता…

ड्रायव्हिंग रेंज…

फास्ट चार्जिंगसह सुसज्ज, Ockhi-90 एका फुल चार्जवर 180 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. कंपनीचे एमडी जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरच्या स्पोर्ट्स मोडवर 160 किमीची रेंज उपलब्ध असेल. परंतु त्यांचं असं मत आहे की, ही स्कूटर इको मोडवर 200 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. Okinawa Autotech बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी मिळते.

जबरदस्त फीचर्स :-

अत्यंत पॉवरफुल Okinawa Okhi 90 सध्या देशात उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते आणि ग्राहकांना फुल पैसे वसूल फीचर्स देत आहे.

Okhi-90 मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. त्यामध्ये इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटली इन्फॉर्मेटिव्ह स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाइल चार्जिंग यूएसबी-पोर्ट, लगेज बॉक्स लाइट, जिओ-फेसिंग, सेक्युर पार्किंग यांसारखे अनेक फीचर्सचा समावेश आहे.

ही स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला बॅटरी चार्जिंगची माहिती, स्पीड अलर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट, म्युझिक प्ले कंट्रोल्स तसेच इन्शुरन्स मेन्टेनन्ससाठी ही अलर्ट देते.

कनेक्ट अँपमध्ये बरेच सारे फीचर्स..

तुम्ही Okinawa Connect अँप डाउनलोड करू शकता, जे त्याच्या राइड अनुभवाचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी अनेक फीचर्स ऑफर करते. उदाहरणार्थ, यामध्ये Find My Scooter फंक्शन देण्यात आलं आहे. जे तुम्हाला तुमची ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटर शोधण्यात मदत करेल. यात OTA (ओव्हर द एअर) अपडेट्सचीही सुविधा देण्यात आली आहे.

या नवीन मोबाईल अँपमुळे ई-स्कूटर चोरीला गेल्यास ती जाग्यावर बंद ही करता येणार आहे. हे ड्रायव्हरला स्कोअर ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंगची सुविधा देखील देते जे वाहन मालकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे…

कलर ऑप्शन :-

Okinawa Autotech ने आकर्षक लुक देण्यासाठी Okinawa-90 4 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये ग्लॉसी वाईन रेड, ग्लॉसी पर्ल व्हाइट, ग्लॉसी अँश ग्रे आणि ग्लॉसी ज्वेलरी ब्लू यांचा समावेश आहे.

किंमत आणि स्पर्धा :-

Okinawa Ockhi 90 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देशभरात Ex-showroom किंमत 1.21 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारपेठेत त्याची स्पर्धा ओला एस1 , सिंपल वन, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब, एथर 450X यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी होईल…

Okinawa Okhi 90 की कीमत  एक्स-शोरूम कीमत (रुपये)
 पॅन इंडिया 1,21,866 (फेम-2 सब्सिडी के बाद)
दिल्ली 1,03,866
महाराष्ट्र 1,03,866
गुजरात 1,01,866
राजस्थान 1,14,866
ओडिशा 1,16,866

 

1.8 वर्षांच्या संशोधनानंतर Okhi 90 लाँच….

Okinawa Okhi 90 लाँच करताना, जितेंद्र शर्मा, व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक, Okinawa Autotech म्हणाले, “Okinawa Okhi 90 जवळजवळ 1.8 वर्षांच्या संशोधनानंतर भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. Okinawa Ockhi-90 मध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरबद्दलची ग्राहकांची धारणा पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे. स्कूटर केवळ तिच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेनुसारच नाही तर आजच्या जगात ग्राहकांच्या मागणीनुसार एक परिपूर्ण दुचाकी म्हणून देखील आहे.

शहरी वाहतुकीसाठी विशेषतः अनुकूल बनवण्यासाठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शक्ती समाविष्ट केली आहे. अपवादात्मक टिकाऊ फ्रेमने बनलेली, Ockhi-90 ग्राहकांसाठी ‘Responsible choice’ बनली आहे. तिचा हाय परफॉर्मन्स, फास्ट चार्जिंग क्षमता आणि प्रचंड बॅटरी क्षमता यामुळे ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती योग्य ठरते कारण भारतात ईव्ही स्वीकारणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.