शेतीशिवार टीम,11 डिसेंबर 2021:- म्युच्युअल फंड ही स्कीम मार्केटशी जोडलेली गुंतवणूक आहे. म्हणून तुम्ही जेव्हाही गुंतवणूक कराल तेव्हा हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की, ही रिस्क फ्री गुंतवणूक नाही. तज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केली तर एकीकडे रिस्क फॅक्टर कमी होतात, तर दुसरीकडे हाय रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते.
मात्र यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP ही पद्धत सर्वोत्तम मानली जाते. फक्त रु. 1000 गुंतवून तुम्ही म्युच्युअल फंडांद्वारे 1 कोटी रुपयांचा निधी कसा मिळवू शकता ते आपण जाणून घेऊयात….
SEBI Registered Expert जितेंद्र सोलंकी यांचं म्हणणं आहे की, दीर्घकाळात, म्युच्युअल फंड 12% पर्यंत रिटर्न्स देऊ शकतात. परंतु जर तुम्ही ते जास्त काळ ठेवले तर तुम्हाला 15 ते 16% रिटर्न्स मिळू शकतो.
मात्र यासाठी एसआयपी (SIP) निवडण्यासोबतच चांगली तयारीही करावी लागेल. जितेंद्र सोलंकी म्हणतात की जर कोणी 34 वर्षांसाठी 1000 रुपये गुंतवले तर फंड 1 कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकतो.
Investment expert कार्तिक ज्वेहरी सांगतात की, जसजसं उत्पन्न वाढेल, तसतशी गुंतवणुकीची टक्केवारी वाढवणे योग्य ठरेल. ट्रान्ससेंड कॅपिटलचे गुंतवणूक संचालक कार्तिक ज्वेहरी म्हणतात,
मासिक गुंतवणूक रु 1000 असल्यास आणि दरवर्षी गुंतवणूक 15% ने वाढवली पाहिजे. त्यामुळे 26 वर्षांत एक कोटी रुपयांचा निधी निर्माण होऊ शकतो. म्हणजेच 8 वर्षांत सरासरी एक कोटींचा निधी आधीच तयार होणार आहे.