शेतीशिवार टीम, 28 जून 2022 : तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवता का ? मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर डिमॅट खातेदारांनी 30 जूनपर्यंत KYC करणे आवश्यक आहे. जर तुम्ही KYC केले असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. पण KYC न केल्यास डिमॅट खाते डीॲक्टिव्ह केलं जाईल. आणि अशा परिस्थितीत तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवू शकणार नाही…

SEBI ने बदलले नियम :-

शेअर बाजार नियामक SEBI ने डिमॅट खात्याचे नियम बदलले आहेत. यानुसार, तुम्ही डिमॅट खातेधारक असल्यास, तुम्हाला 30 जून 2022 पर्यंत KYC करणे आवश्यक आहे. KYC न केल्यास डीमॅट खाते डीॲक्टिव्ह केले जाईल. त्यानंतर तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करू शकणार नाही…

प्रोसेससाठी व्हेरिफिकेशन जरूरी :-

जर एखाद्याने कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील तर त्याच्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर होणार नाहीत. KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतरच शेअर्स खात्यात ट्रान्सफर केले जातील. नवीन नियमानुसार, डीमॅट खात्यात नाव, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्न मर्यादा यासह KYC करणे आवश्यक आहे.

कसे कराल KYC ?

स्टॉक ब्रोकर्स त्यांच्या ग्राहकांना लवकरचKYC करण्याचा सल्ला देतात. यामुळे तुमचे डिमॅट खाते डीॲक्टिव्ह होणार नाही. अनेक ब्रोकरेज घरबसल्या पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांना ऑनलाइन KYC सुविधा देत आहेत. तुम्ही ब्रोकरेज हाऊसच्या कार्यालयात जाऊन KYC अपडेट देखील मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *