शेतीशिवार टीम, 13 जानेवारी 2022 : कोरोनाच्या काळात शेअर बाजार (Stock Market) मध्ये चांगली वाढ झालेली दिसत आहे. या काळात पेनी स्टॉक्सने दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असले तरी, कंपनीचे फंडामेंटल्स भक्कम असल्यास आणि बिजनेस मॉडल आशादायक असल्यास आपण स्टॉकमधून बंपर रिटर्नची अपेक्षा करू शकता. सिम्प्लेक्स पेपर्स शेअर (Simplex Papers) हे जिवंत असं उदाहरण आहे. या पेपर प्रोडक्ट निर्मात्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकांना 7,000 % रिटर्न्स दिले आहे.

71.30 रुपयांवर पोहोचला हा शेअर :-

सिम्प्लेक्स पेपर्स शेअर (Simplex Papers) या कंपनीचा शेअर एका वर्षात 1 रुपये वरून 71.30 रुपयांपर्यंत वाढला. आज 14 जानेवारी 2022 रोजी हा शेअर नफावसुलीमुळे 67.75 रुपयांवर पोहोचला आहे. सिम्प्लेक्स पेपर्सचा शेयर्स गेल्या एक महिन्यापासून विक्रीच्या टप्प्यातून जात आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या एका आठवड्यातील सर्व 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये लोअर सर्किटवर आहे आणि सुमारे 17 टक्क्यांनी घसरला आहे.

त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात, पेनी स्टॉक 122.70 रुपयांच्या ऑल टाइम हायवर होता. या कालावधीत, या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 2.50 % रिटर्न्स दिला आहे. पण गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.41 रुपयांवरून 71.30 रुपये प्रति शेअर झाला. या कालावधीत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1500 % रिटर्न्स दिले आहेत.

गुंतवणूकदार मालामाल झाले :- 

(Simplex Papers) च्या शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 16 लाख झाले असते. तर वर्षभरापूर्वी सिम्प्लेक्स पेपर्सच्या स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आज 71 लाख रुपये झाले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *