शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : बँकेच्या बचत योजनांमध्ये (FD) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे की, अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त रिटर्न्स मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक (HDFC बँक) यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत, तर एचडीएफसी (HDFC) बँकेने 0.05 ते 0.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. लक्षात ठेवा की, या बँकांनी एफडीच्या (FD) सर्व मॅच्युरिटी कालावधीवरील व्याजदरात वाढ केलेली नाही. ही वाढ काही मुदतीच्या बचत योजनांसाठी आहे.

एसबीआय एफडी (SBI FD) 10 बेसिस प्वॉइंट्स वाढ :-

SBI च्या म्हणण्यानुसार, बँकेने 1 वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD मध्ये 10 बेस पॉइंट्सने व्याजदर वाढवले ​​आहेत. या कालावधीतील एफडीवरील (FD) व्याजदर आता 5 टक्क्यांवरून 5.1% करण्यात आला आहे. हा व्याजदर 15 जानेवारी 2022 पासून लागू झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर 5.6% व्याज मिळेल, जे आधी 5.5% होतं.

गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने बेस रेट 0.10 टक्के किंवा 10 बेसिस पॉइंटने वाढवला होता. बेस रेटमध्ये वाढ झाली म्हणजे व्याजदर कमी होण्याचा ट्रेंड आता बदलत आहे. भविष्यात व्याजदरात आणखी काही वाढ होऊ शकते.. .

SBI नवीनतम FD व्याज दर :-

07 दिवसांपासून 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर – 2.9 %
46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदत ठेवींवर – 3.9 %
180 दिवस ते 210 दिवसांच्या मुदत ठेवींवर – 4.4%
211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी मुदत ठेवी – 4.4 %
मुदत ठेव 1 वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी – 5.1%
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधी – 5.1%
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी – 5.3%
5 वर्षे ते 10 वर्षे कालावधी – 5.4%

HDFC बँक (HDFC बँक) :-

HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.05-0.1% वाढ केली आहे. आता बँकेत 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे FD वर वार्षिक 5.2%, ‘3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे’ आणि ‘5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे’ FD वर वार्षिक 5.4% व्याजदर आहे. रु. पर्यंतच्या FD वर वार्षिक 5.6 टक्के वार्षिक असेल.हे नवे व्याजदर 12 जानेवारी 2022 पासून लागू झाले आहेत.

HDFC बँक नवीनतम FD व्याज दर :-

07 दिवस ते 14 दिवसांचा कालावधी – 2.50%
15 दिवस ते 29 दिवसांचा कालावधी – 2.50%
30 दिवसांपासून 45 दिवसांपर्यंतचा कालावधी – 3.00%
61 दिवस ते 90 दिवसांचा कालावधी – 3.00%
91 दिवस ते 6 महिने कालावधी – 3.50%
6 महिने ते 9 महिने कालावधी – 4.40%
9 महिने ते एक वर्षापेक्षा कमी – 4.40%
एक वर्षाच्या कालावधीसाठी – 4.90%
1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंत – 5.00 %
2 वर्षे ते 3 वर्षे – 5.20%
तीन वर्षे ते पाच वर्षे – 5.40%
5 वर्षे ते 10 वर्षे – 5.60%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *