शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : तुम्ही नोकरी करत असाल तर पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करावी. जर तुमचा पगार आयकर स्लॅब अंतर्गत येतो आणि तुमच्यावर टॅक्स आकारला जातो, तर तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, जिथे सरकारकडून कर बचत योजना (Tax saving plan) उपलब्ध आहे.

सध्या देशात अशा अनेक योजना आहेत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून कर (Tax) वाचवू शकता. आज येथे तुम्हाला अशा तीन कर बचत (Tax saving plan) योजनांबद्दल सांगण्यात येणार आहे, जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचा आयकर (Income tax) वाचवू शकता आणि भविष्यासाठी एक चांगला निधी देखील तयार करू शकता…

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) :-

कर (Tax) वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी PPF हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेअंतर्गत, कोणताही गुंतवणूकदार एका वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. PPF वर वार्षिक 7.1 % व्याजदर आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे गुंतवणुकीचे पैसे, गुंतवणुकीच्या पैशावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम हे सर्व करमुक्त (Tax free) आहेत.

मुदत ठेव (Fixed Deposit) :-

PPF व्यतिरिक्त तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करू शकता. येथे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर सूट (Tax deduction) देखील मिळते. परंतु, येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, या योजनेतील लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्ही 5 वर्षापूर्वी पैसे काढू शकत नाही. तसेच , FD वर उपलब्ध व्याजदर नेहमी बदलत असतात.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) :-

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 7.6% व्याज मिळतं . या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या खात्यात वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. येथे 14 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर गुंतवणूकदाराला पूर्ण व्याजासह पैसे परत मिळतात. येथे गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असायला हवं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *