शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : जर तुम्ही सरकारी नोकरीसोबतच (Government Job) देशाची सेवा करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.भारतीय (Indian Coast Guard) तटरक्षक दलाने 50 पदांची भरती केली आहे. यामध्ये असिस्टंट कमांडंट, टेक्निकल इंजिनीअर आणि टेक्निकल इलेक्ट्रिशियन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी ग्रेजुएट कैंडिडेट्स 17 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 6 डिसेंबर आहे.असिस्टंट कमांडंट पदासाठी 56,100 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.
महत्वाची तारीख :-
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:- 6 डिसेंबर 2021 पासून सुरू होत आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 डिसेंबर 2021.
कोणत्या पदासाठी किती पोस्ट आहे :-
जीडीGD, सीपीएल CPL (SSA-एसएसए) – 40 पदे
तांत्रिक (इंजीनियरिंग), तांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 पदे
अर्ज कोण करू शकतो ?
जनरल ड्यूटी :-
पात्रता- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कँडिडेट्स म्हणजेच उमेदवारांकडे 60% गुणांसह ग्रेजुएट डिग्री असणे आवश्यक आहे. 60% गुणांसह गणित आणि फिजिक्स मध्ये इंटरमिजिएट किंवा 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
वय- जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान झालेला असावा.
कॉमर्शियल पायलट एंट्री:-
पात्रता- या पदासाठी अर्ज करणारे कँडिडेट्स 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत. यासोबतच त्यांनी फिजिक्स आणि मॅथ्स सब्जेक्ट स्टडी केलेला असावा. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA-डीजीसीए) द्वारे जारी केलेला / वैध व्यावसायिक पायलट परवाना (CPL) असणे आवश्यक आहे.
वय- 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान जन्म.
तांत्रिक (इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिकल)
पात्रता- 60% गुणांसह इंजीनियरिंग डिग्री. इंजीनियरिंग शाखा : नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल, मरीन किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन किंवा मेटलर्जी किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेसमध्ये डिग्री.
वय- तांत्रिक (इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिकल)- जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
निवड कशी होईल :-
कँडिडेट्सची सिलेक्शन रिटेन एग्जाम, फिजिकल एग्जाम आणि मेडिकल टेस्टच्या आधारे केली जाईल. या रिक्त पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी, कँडिडेट्स ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी www.joinindiancoastguard.gov.in या वेबसाईटवर जाऊन क्लिक करा…