Take a fresh look at your lifestyle.

अनुशापोटी तुळशीची फक्त 5 पाने चावून खा ; ‘हे’ 5 गजब फायदे वाचा, हिवाळ्यातही राहाल एकदम हेल्दी…

0

शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : पोषक घटकांनी भरपूर असलेली तुळशीची पाने अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये वापरली जाते. त्याचे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्कृष्ट मानले जातात. तज्ञांचं म्हणणं आहे की, रोज तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने आपली त्वचा तर सुधारतेच पण ते वृद्धत्वाची म्हणजेच (एजिंग प्रोसेस) मंदावते. तर जाणून घ्या अनुशापोटी तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचे 5 गजब फायदे…

मेटाबॉलिज्म :-

तुळशीची पाने आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि ते मेटाबॉलिज्म सिस्टम खूप जलद ठीक करतं, याशिवाय गॅस, अँसिडिटी किंवा विविध प्रकारच्या पचनाशी संबंधित विकारांमध्येही तुळशीची पाने आरामदायी ठरतात.

बॉडी डिटॉक्सिफिकेशन :-

तुळशीच्या पानांमध्ये शरीर डिटॉक्स करण्याची क्षमता असते.त्यातील फायदेशीर घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

तोंडातील बॅक्टेरिया :-

तुळशीच्या पानांमुळे तोंडात लपलेले बॅक्टेरिया देखील मुळापासून नष्ट होतात. याचे सेवन केल्यावर तुम्हाला तुमच्या श्वास घेण्यात ताजेपणा जाणवेल.

सर्दी-खोकलयापासून आराम :-

हिवाळ्यात लोकांमध्ये सर्दी-खोकलयाची समस्या वारंवार उद्दभवते. अशा समस्येतही तुळशीची पाने शरीराला आराम मिळवून देण्याचे काम करतात आणि रोगाशी लढण्यास देखील मदत करतात.

स्ट्रेस :-

स्ट्रेस-डिप्रेशन संबंधित समस्यांवरही तुळशीची पाने खूप गुणकारी मानली जातात. याच्या पानांमध्ये असलेले एडेप्टोजन मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.