Take a fresh look at your lifestyle.

हिवाळ्यात ‘हे’ 5 सुपरफूड खा, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल ; आजारांपासून राहाल दूर !

0

शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करू लागतात. उबदार कपड्यांपासून ते जेवणापर्यंत विशेष लक्ष देतात. तर अशा काही गोष्टींचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासोबतच शरीर उबदार राहते. अशाच काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत. त्यांचे सेवन करून तुम्ही हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता.जाणून घ्या या सुपरफूड्सबद्दल….

1) ऊस :-

ऊस आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. विशेष म्हणजे सर्वात जुने डिटॉक्स फूड आहे जे यकृत देखील निरोगी ठेवते. यासोबतच हिवाळ्याच्या उन्हात त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. एवढेच नाही तर वजन कमी करण्यासही मदत होते.

2) तीळ आणि गूळ :-

हिवाळ्यात गुळासोबत तिळाचे सेवन केल्याने झोप चांगली लागते. यामध्ये फॅटी ऍसिड असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात तसेच वजन कमी करण्यास देखील खूप गुणकारी आहे आणि अनेक आजारांपासून संरक्षण करते.

3) चिंच :-

खट्टी-मिट्टी चिंच आरोग्यासाठी चांगली मानली जाते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. यासोबतच याच्या भाजलेल्या बिया ताकासोबत मिसळून पिल्यास एक स्वादिष्ट ड्रिंक बनते.

4) आवळा:-

हिवाळ्याचा राजा म्हणून ओळखलं जाणारं फळ आवळा हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे संसर्गाशी लढण्यास प्रोत्साहन देते, तसेच तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कच्चा आवळा देखील खाऊ शकता किंवा मुरब्बा, च्यवनप्राश, शरबत इत्यादी बनवू शकता.

5) बोरं :-

हिवाळ्यात बेरी भरपूर उपलब्ध असतात.तुमच्या आहारातही याचा समावेश नक्की करा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.जे मुले अनेकदा आजारी पडतात, त्यांच्यासाठी हि बोरं चांगले आहेत .यासोबतच हे पचनसंस्था देखील सुरळीत ठेवण्यास मदत करते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.