आत्तापर्यंत तब्बल 26 लाख युनिट्सची विक्री, आता CNG व्हेरियंटही लॉन्च ; फक्त मायलेजच नाही तर सेफ्टीतही दमदार ; पहा ‘या’ 5 खास गोष्टी…
शेतीशिवार टीम : 16 ऑगस्ट 2022 :- देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने बाजारपेठेत आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती स्विफ्टचे नवीन CNG व्हेरियंट लॉन्च केलं. या कारच्या CNG व्हेरिएंटची खूप प्रतीक्षा होती आणि अखेर कंपनीने ती विक्रीसाठी लॉन्च केली आहे. या कारच्या एक्सटीरियर व इंटीरियर भागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, फक्त कंपनीने फिटेड CNG किट सध्याच्या पेट्रोल इंजिनसह समाविष्ट केलं आहे.
मारुती सुझुकीचा दावा आहे की, ही या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल CNG हॅचबॅक कार आहे. तुम्हीही मारुती स्विफ्टच्या CNG व्हेरिएंटची वाट पाहत असाल आणि आता ती खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या कारशी संबंधित 5 खास गोष्टींबद्दल नक्की जाणून घ्या…
1) – किंमत आणि व्हेरियंट :-
कंपनीने नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट CNG VXi आणि ZXi ट्रिमसह फक्त दोन व्हेरियंटमध्ये ऑफर केली आहे. म्हणजेच ही कार फक्त मिड आणि टॉप व्हेरियंटमध्येच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याच्या VXi व्हेरियंटची किंमत 7.77 लाख रुपये (Ex-showroom) आणि ZXi व्हेरिएंटची किंमत 8.45 लाख रुपये (Ex-showroom) निश्चित करण्यात आली आहे. लक्षात ठेवा की मारुती स्विफ्टच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते तर पेट्रोलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7.50 लाख रुपयापर्यंत जाते.
2) – इंजिन आणि परफॉर्मन्स :-
कंपनीने या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअल जेट VVT पेट्रोल इंजिन वापरलं आहे, जे नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन आहे. हे इंजिन कंपनीने पेट्रोल आणि CNG या दोन्ही व्हर्जनवर चालण्यासाठी तयार केलं आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 76.5bhp पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते, तर पेट्रोल मोडमध्ये हे इंजिन 87.8bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. बाजारातील इतर CNG कार प्रमाणे, मारुती स्विफ्ट देखील 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.
3) – जबरदस्त मायलेज :-
कंपनीचा दावा आहे की, मारुती सुझुकी स्विफ्टचे CNG व्हेरियंट 30.90 Kmpl पर्यंत मायलेज देते. तसेच, त्याचे पेट्रोल मॅन्युअल वेरिएंट 22.38 Km आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 22.56 Kmpl मायलेज देते. मारुती WagonR च्या CNG व्हेरियंटपेक्षा या कारचे मायलेज थोडे कमी असले तरी मारुती वॅगनआर 34.05 Kmpl पर्यंत मायलेज देते.
4) – गंज आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण :
CNG कारमध्ये शॉर्ट सर्किट किंवा आग लागण्याचा धोका जास्त असतो. पण Maruti Suzuki ने या कारमध्ये गंज आणि शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी काही सुधारणा केल्या आहेत आणि स्टेनलेस स्टील पाईप्स आणि इंटिग्रेटेड वायरिंग हार्नेसचा वापर केला आहे.
याशिवाय मारुती सुझुकीने एक मायक्रोस्विच देखील प्रदान केला आहे, जो CNG रिफिल करताना इंजिन सुरू होण्यापासून रोखतो आणि हे रिफिलिंगच्या वेळी सेफ्टी देखील प्रदान करते. कारला ड्युअल इंडिपेंडेंट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECU) आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टम मिळते. ही सिस्टीम कारच्या मायलेजवर परिणाम न करता चांगली कामगिरी करते.
5) – मिळतात हे जबरदस्त सेफ्टी फीचर्स :-
कंपनीने या कारमध्ये सेफ्टीचीही पूर्ण काळजी घेतली आहे, या कारला EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, फ्रंट फॉग लॅम्प, ISOFix चाइल्ड सीट अँकरेज फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटर, पिंच गार्ड, पॉवर विंडो (Driver side), इंजिन इमोबिलायझर, स्पीड-सेन्सिटिव्ह ऑटोमॅटिक डोअर लॉक, रीअर व्ह्यू मिररच्या आत ॲडजस्टेबल, हाय स्पीड अलर्ट सिस्टम, सीट बेल्ट रिमाइंडर आणि बजर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सेफ्टी अलार्म सिस्टम आणि बरेच काही…
मारुती सुझुकी स्विफ्ट S-CNG मध्ये ड्युअल इंडिपेंडेंट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECUs) आणि Optimum Air-Fuel रेशो प्रदान करण्यासाठी इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टम आहे. ही इंधन सिस्टम कार्यक्षमतेचा त्याग न करता चांगली कामगिरी प्रदान करते.
तसेच, मारुती सुझुकीने गंज आणि शॉर्ट सर्किट टाळावी व सुरक्षितता सुधारण्यासाठी स्टेनलेस स्टील पाईप्स आणि इंटिग्रेटेड वायरिंग हार्नेसचा वापर केला आहे. तसेच, मारुती सुझुकीने एक मायक्रोस्विच बसवला आहे जो CNG रिफिल होत असताना इंजिन सुरू होऊ देत नाही