शेतीशिवार टीम : 16 ऑगस्ट 2022 :- देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या मेगा इव्हेंटमध्ये अनेक घोषणा केल्या. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कारवरील पडदा हटवल्यानंतर कंपनीने आपली सर्वात स्वस्त नवीन S1 इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च केली.

या-व्यतिरिक्त, या कार्यक्रमाच्या शेवटी, कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त S1 प्रो खाकी मॉडेल लाँच केलं. हे मर्यादित संस्करण मॉडेल आहे, जे मर्यादित संख्येत विकलं जणार आहे. नवीन Grizzly मॉडेलमध्ये सध्याच्या S1 Pro मॉडेलसारखेच कॉन्फिगरेशन आहे, परंतु या मॉडेल्स किंमत किंचित जास्त आहे.

कंपनीने एका छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये नवीन Ola S1 Pro खाकी व्हेरिएंटचे डिटेल्स सांगितले. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूटरचे फक्त 1947 युनिट्स विकले जातील, जे देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्षाला समर्पित आहे आणि हा क्रमांक स्वातंत्र्य दिनाचे प्रतीक आहे. Ola S1 Pro खाकी उर्फ ​​फ्रीडम एडिशन 170 किमीच्या रेंजसह येते, तर ARAI-प्रमाणित रेंज 181Km आहे. तो 116Km प्रतितास इतका वेग गाठू शकते. आणि त्यात हायपर मोड देखील आहे.

Ola ने सांगितले की, नवीन फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी नवीन वाहन MoovOS 3 वर अपडेट करणे आवश्यक आहे. नवीन व्हेरियंटचा संपूर्ण बॉडी कलर गडद हिरवा आहे, जो पूर्णपणे खाकी नाही. हा एक मॅट फिनिश पेंट आहे, म्हणून जे ग्लॉसी फिनिश म्हणजे चमकदार कलरच्या शोधत आहेत त्यांची निराशा होऊ शकते. इतर कलरच्या मॉडेल्सप्रमाणे हेड आणि टेल लॅम्प दिलेले आहेत. बाजारातील इतर स्कूटर्सपेक्षा ती खूपच वेगळी आहे.

किती आहे किंमत :-

Ola S1 Pro चे नवीन खाकी व्हेरियंट इतर मॉडेल्सच्या तुलनेत किंचित महाग आहे. S1 Pro खाकीची Ex-showroom किंमत 1,49,999 रुपये आहे. हे 3,999 रुपये प्रति महिना पासून EMI सुविधेसह देखील ऑफर केलं जात आहे. नवीन S1 Pro खाकी ओला इलेक्ट्रिक वेबसाइटवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

वेबसाइटवर फ्रीडम एडिशन म्हणून ओळखल्या जाणार्‍या खाकी रंगाव्यतिरिक्त, Ola S1 Pro पोर्सिलेन व्हाइट, निओ मिंट, कोरल ग्लॅम, हेट ब्लॅक, मार्शमॅलो, लिक्विड सिल्व्हर, मिलेनियल पिंक, अँथ्रासाइट ग्रे, मिडनाईट ब्लू आणि मॅटमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *