CNG किटपासून सनरूफ पर्यंत, नेक्स्ट जेनरेशन Maruti Brezza CNG व्हेरियंट लॉन्च !

0

शेतीशिवार टीम, 10 एप्रिल 2022 :- भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांना नवीन कार घ्यायची आहे, त्यांनी सीएनजी (CNG) कारचा विचार सुरू केला आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी सीएनजी (CNG) वाहने बाजारात आणली आहेत. त्याचवेळी, यंदा कार्स लव्हर्स मारुती सुझुकीच्या कारची आतुरतेने वाट पाहत आहेत. ती म्हणजे विटारा ब्रेजा Maruti Brezza CNG मॉडेल…

मारुती सुझुकीने अलीकडेच नवीन Maruti Suzuki Celerio CNG, Maruti Suzuki Dzire CNG आणि Maruti Suzuki Baleno CNG या तीन कार्स लाँच केल्या असून त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतं आहे.

आता मारुती सुझुकी आपल्या कॉम्पॅक्ट SUV Vitara Brezza चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल देखील लॉन्च करणार आहे. या कारमध्ये प्रथमच सीएनजी (CNG) किटसोबत बरेच काही पाहायला मिळणार आहे. आपण या नवीन Maruti Suzuki Baleno CNG च्या लुक – फीचर्स इंजिन-पॉवर आणि ट्रान्समिशन डिटेल्स बद्दल जाणून घेणार आहोत…

पेट्रोल इंजिन आणि CNG किट :-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी 2022 Maruti Suzuki Vitara Brezza मध्ये कॉम्पॅक्ट SUV मध्ये एक नवीन इंजिन दिसणार आहे, जे 1.5 लीटर K15C Dualjet पेट्रोल इंजिन असेल आणि ते 115bhp पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम असणार आहे जे सध्याच्या 104bhp इंजिनपेक्षा थोडे अधिक पॉवरफुल आहे. याशिवाय नवीन ब्रेझामध्ये फॅक्टरी फिट केलेले सीएनजी (CNG) किटही पाहायला मिळणार आहे जे मायलेज मध्येही सुधारणा होणार आहे.

नवीन मारुती ब्रेझा मधील एक खास फीचर्स म्हणजे या कारला सध्याच्या 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटच्या तुलनेत 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल. इतकंच नाही तर स्पोर्ट मोड, मॅन्युअल शिफ्ट ऑप्शन आणि अँडेड रेशो यामध्ये पाहता येईल. यासोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन असेल.

फीचर्स :-

फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी विटारा ब्रेझामध्ये बरेच कॉस्मेटिक बदल पाहायला मिळतील. यात नवीन ग्रिल, हेडलॅम्प आणि टेललॅम्प तसेच नवीन फ्रंट आणि रियर बंपर मिळतील.2022 मारुती ब्रेझामध्ये फॅक्टरी – फिटेड सनरूफ, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा आणि पॅडल शिफ्टर तसेच वायरलेस Android ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्ट, वायरलेस चार्जिंगसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह, ऑटोमॅटिक एसी उपलब्ध असणार आहे.

सेफ्टी :-

नवीन Brezza मध्ये 6 एअरबॅग्ज आणि ESP सह कनेक्टेड कार टेक्नॉलजी आणि अँडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम यांसारखे फीचर्स मिळणार आहे.

लॉन्च आणि किंमत :-

नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी विटारा ब्रेझा येत्या 2-3 महिन्यांत लॉन्च केली जाऊ शकते आणि त्याची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.