Take a fresh look at your lifestyle.

Share Market : एका वर्षात 1 लाखांचे झाले 13.30 लाख ; तर 1 महिन्यातच झाले 2.76 लाख !

0

शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : शेअर मार्केटमध्ये धोका तर असतोच पण चांगले रिटर्न्स देखील मिळतात. तुम्हाला गुंतवणुकीवर शेयर मार्केटमधून जितका पैसा मिळेल तितका कुठूनही मिळणार नाही. परंतु अनेकदा लोक जोखमीमुळे शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापासून मागे राहतात.

पण जर तुम्हाला शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे असतील तर काही मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे संशोधन (Research). तुम्हाला ज्या कंपनीत पैसा गुंतवायचा आहे त्या कंपनीचे सखोल संशोधन करावं लागेल.

दुसरी गोष्ट म्हणजे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे. त्याचप्रमाणे, मार्केट पडलं तर घाबरून न जाता प्रतीक्षा करणं असं केल्यास नक्कीच फायदा होतो. अशा शेयर्सने 2021 मध्ये आतापर्यंत गुंतवणूकदारांना 1290 % इतका मोठा परतावा दिला आहे. या शेअरचे डिटेल्स जाणून घेऊयात…

आपण सध्या पोलो क्वीन इंडस्ट्रियलबद्दल (Polo Queen Industrial) बोलत आहोत. या कंपनीच्या स्टॉकने 2021 मध्ये आतापर्यंत 1230 % परतावा दिला आहे. 1 जानेवारीला तो 6.41 रुपये होता, तर आज तो 85.25 रुपये आहे. म्हणजेच, त्याने 1229.95 टक्क्यांनी झेप घेतली आहे आणि गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांमधून सुमारे 13.30 लाख रुपये कमावले आहेत. पोलो क्वीन (Polo Queen) ही स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल रु. 572.45 कोटी आहे.

6 महिन्यांत जास्त रिटर्न्स :-

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत जास्त परतावा दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी तो 5.73 रुपये होता, तर आज 85.25 रुपये आहे. म्हणजेच 1388 % परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांपूर्वी ज्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील, त्याची गुंतवणूक आजच्या घडीला सुमारे 14.88 लाख रुपये झाली असेल.

एका महिन्यात दुप्पटीहून अधिक नफा :-

या शेयर्सने गेल्या 1 महिन्यात जोरदार परतावा दिला आहे. 1 महिन्यापूर्वी तो 30.90 रुपये होता, तर आज 85.25 रुपये आहे. म्हणजेच 1 महिन्यात 175.89% परतावा दिला आहे. 1 महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील, त्याच्या गुंतवणुकीची रक्कम आता सुमारे 2.76 लाख रुपये झाली आहे.

काय आहे कंपनीचा बिझिनेस :-

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड हे राजकमल हाऊसचे आहे, ज्याची स्थापना 5 दशकांपूर्वी जीवनराम संघाई यांनी केली होती. ही एक सार्वजनिक सूचीबद्ध बहु-विभाग कंपनी आहे जी खनिज व्यापार, फार्मास्युटिकल्स, FMCG उत्पादने आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे. हाऊस ऑफ राजकमल हे त्याच्या उच्च स्तरावरील सचोटी, दीर्घकालीन स्थिरता आणि विविध प्रयत्नांसाठी वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.