Take a fresh look at your lifestyle.

Heart Attack : धाप लागणे, जबडा, खांदा दुखणे ; हे आहेत हार्ट अटॅक चे 10 लक्षणं ; इग्नोर करू नका…

0

शेतीशिवार टीम, 8 डिसेंबर 2021 : खराब जीवनशैली आणि खाणं-पिण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा बऱ्यापैकी धोका वाढला आहे. अशा समस्यांमुळे कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. साधारणतः रक्तामध्ये गुठळ्या तयार झाल्यामुळे,हृदयाला पंप करण्यासाठी, म्हणजेच शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पोहोचवण्यासाठी हार्ट ला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयाच्या स्नायूंचा विस्तार होऊ लागतो आणि हृदयाचा आकारही बदलू लागतो. हार्ट अटॅक येण्याचे हे एक कारण आहे. आम्ही तुम्हाला त्याच्या वॉर्निंग साइन म्हणजे लक्षणांबद्दल सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया .

अनियमित हृदयाचे ठोके :-

एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची धडधड वाढणे किंवा कमी होणे सामान्य आहे ,पण जेव्हा तो खूप चिंताग्रस्त किंवा उत्साही असतो. तेव्हा जर तुमच्या हृदयाचे ठोके काही सेकंदांपेक्षा जास्त काळ नियंत्रणाबाहेर जात असतील तर त्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

हाताला किंवा टाचांना सूज येणे :-

जर एखाद्या व्यक्तीचे पाय, बोटे किंवा टाचांमध्ये सूज येण्याची समस्या वाढत असेल तर ती गंभीर बाब असू शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की बऱ्याच वेळा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा हात आणि पायांवर सूज वाढू लागते.

घाम येणे:-

जास्त घाम येणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. विशेषत: कमी तापमानात म्हणजेच थंडीतही तुम्हाला घाम येत असेल तर ही समस्या अधिक गंभीर असू शकते.

खांदा दुखणे :-

हाताव्यतिरिक्त खांदे किंवा पाठीत सतत दुखत असेल तर तुम्ही काळजी घ्या. हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून येतात.

जबडा, दात किंवा डोके दुखणे :-

अनेक रुग्णांनी हार्ट अटॅक येण्यापूर्वी हात,जबडा, दात किंवा डोके दुखण्याची तक्रार केली आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर लवकरात लवकर तपासा.

सततचा खोकला येणे :-

सतत खोकल्याचा संबंध हार्ट अटॅक किंवा हार्ट संबंधित आजारांशी जोडलेला आहे असं नाही. पण जर तुम्हाला हार्ट अटॅक कोणताही त्रास होत असेल, तर सतत येणाऱ्या खोकल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच खोकताना पांढरा किंवा गुलाबी रंगाचा श्लेष्मा बाहेर पडत असेल तर ते हार्ट फेलियरचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

श्वास घेण्यात अडचण :-

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा पूर्ण श्वास घेतल्यानंतरही तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. याशिवाय काही लोकांना अस्वस्थता,अपचन, छातीत जळजळ होणे आणि ओटीपोटात दुखण्याची समस्या देखील असू शकते.

छातीत जळजळ किंवा अपचन:-

तुमच्या छातीत सतत जळजळ होत असेल किंवा तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगने आवश्यक आहे . अपचन हे एक हार्ट अटॅक चे लक्षण आहे.

उलट्या होणे :-

वारंवार उलट्या होणे आणि ओटीपोटात दुखणे हे देखील हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणार्‍या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे. या प्रकारची लक्षणे गांभीर्याने समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

झोपेत घोरणे :- 

झोपेत घोरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तरी मोठ-मोठ्याने घोरण्याच्या आवाजासह गुदमरल्यासारखे वाटणे हे ”स्लीपिंग एपनियाचे” लक्षण आहे. रात्री झोपताना अनेक वेळा आपला श्वास थांबतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त भार पडतो.

Leave A Reply

Your email address will not be published.