कार विकत घेताना सर्वात प्रथम मनात विचार येतो तो सेफ्टीचा, लाखो रुपये गुंतवूनही, जर तुमच्या कारचे सेफ्टी रेटिंग चांगले नसेल, तर अशा कारचा उपयोगच काय ? अपघाताच्या वेळी तुमचे संरक्षण हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. तोच जर या कार्सच्या माध्यमातून सध्या होत नसेल तर अशा कार काही कामाच्या नसतात.
यासाठी तुम्हाला उत्तम सुरक्षितता आणि मजबूत बिल्ड क्वॉलेटीसह कार खरेदी करायची असेल, तर भारतात बनलेल्या टाटा कार तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन ठरतात. टाटाच्या कार किफायतशीर तर असतातच पण त्यांमध्ये तुम्हाला उत्तम बिल्ड क्वॉलेटी देखील प्रदान करण्यात येते. देशात अनेक टाटा कार 5 – स्टार सुरक्षा रेटिंगसह मिळतात. त्यापैकी सर्वात पसंत केली जाणारी कार आहे टाटा पंच (Tata Panch)
टाटा पंचला सेफ्टी रेटिंगमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालेले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या घरी टाटाची कार आणण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला टाटा कारच्या वेटिंग पिरियडबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तर कोणत्या टाटा कारला किती वेटिंग पिरियड आहे हे जाणून घेऊया..
या निवडक टाटा मॉडेल्ससाठी वेटिंग पिरियड 26 आठवड्यापर्यंत..
टाटा मोटर्स हा सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ब्रँडपैकी एक आहे. टाटाच्या सर्व गाडयांना बाजारात चांगली मागणी असते. हेच कारण आहे की काही निवडक टाटा मॉडेल्ससाठी तर 26 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा कारावी लागत आहे.
टाटा हॅरियर आणि टाटा सफारी
Tata Harrier आणि Tata Safari साठी तुम्हाला सुमारे 3 ते 5 आठवड्यांचा वेटिंग पिरीयड देण्यात आला आहे, यामध्ये फक्त डिझेल पॉवरट्रेन ऑप्शन ऑफर केले जात आहे. या कार्सच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शनसाठी वेटिंग पिरीयड समानच आहे .
Nexon साठीचा वेटिंग पिरीयड..
Nexon AMT या व्हेरियंटसाठी व्हेटिंग पिरीयड 16 ते 20 आठवडे आहे, तर Nexon च्या MT व्हेरिएंटसाठी व्हेटिंग पिरीयड सुमारे 8 ते 10 आठवडे आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंट साठी व्हेटिंग पिरीयड समानच असणार आहे.
टाटा पंचचा व्हेटिंग पिरीयड..
टाटा पंच ही 10 लाख रुपयांच्या आत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे, आणि ती अनेक ऑप्शनमध्ये ऑफर केली जाते. पंचाच्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटला तुम्ही निवडलेल्या व्हेरिएंटनुसार सुमारे 3 ते 26 आठवड्यांचा वेटिंग पिरीयड आहे, तर AMT व्हेरियंटला 6 ते 12 आठवड्यांपर्यंत वेटिंग पिरीयड दिला आहे.
टाटा टियागोसाठी वेटिंग पिरीयड..
भारतातील Tata Tiago साठी मॅन्युअल व्हेरिएंटचा वेटिंग पिरियड 3 ते 20 आठवड्यांपर्यंत आहे, तर कारच्या AMT व्हेरिएंटसाठी वेटिंग पिरीयड 14 आठवड्यांपर्यंत आहे.
टाटा टिगोरचा वेटिंग पिरियड
दुसरीकडे, मारुती डिझायर सारख्या कारला टक्कर देणार्या टाटा टिगोरला पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटसाठी 6 ते 8 आठवड्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर AMT व्हेरिएंटसाठी 12 ते 14 आठवड्यांचा वेटिंग पिरियड आहे. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटसाठी 6 ते 8 आठवडे वेटिंग करावी लागू शकते.