दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मारुती सुझुकीने आपली न्यू मिड साईझ SUV मारुती ग्रँड विटारा (Grand Vitara) लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि स्ट्रॉंग इंजिन क्षमतेने सुशोभित केलेल्या या SUV ची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये (Ex-showroom) निश्चित करण्यात आली आहे.
ही SUV पेट्रोल इंजिन तसेच हायब्रीड व्हेरियंट आणि ऑल व्हील ड्राइव्ह टेक्नॉलॉजीसह लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या SUV चे बुकिंग आधीच सुरू केले असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपद्वारे ते बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला 11,000 रुपये बुकिंग रक्कम जमा करावी लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या SUV ची बुकिंग आधीच 55,000 युनिट्सच्या पुढे गेली असून तिचा व्हेटिंग पिरियड 5 ते 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.
दमदार मायलेज असलेली स्ट्रॉंग SUV….
ग्रँड विटारा एकूण 6 व्हेरियंटमध्ये येत असून ही SUV कंपनीच्या प्रीमियम नेक्सा शोरूममधून विकली असून दोन पॉवरट्रेन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, 1.5-लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर ड्युअल VVT पेट्रोल इंजिन. ट्रान्समिशनमध्ये इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड ट्रिमसाठी E-CVT आणि पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड अँटोमॅटिक किंवा प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड ट्रिममध्ये 5-स्पीड मॅन्युअल समाविष्ट आहे.
कंपनीचा दावा आहे की, ही सेगमेंटमध्ये सर्वोत्तम मायलेज देते, त्याचे VVT पेट्रोल इंजिन 21.11 Km आणि हायब्रिड व्हेरियंट 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
ग्रँड विटारा टॉप-अँड अल्फा, Z Eta+ आणि अल्फा+ ट्रिम्सवर ड्युअल-टोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत सुमारे 16,000 रुपये आहे. ग्राहक मारुती सुझुकी सबस्क्रिप्शनद्वारे ग्रँड विटारा घरी देखील आणू शकतात, ज्यासाठी तुम्ही फक्त रु. 27,000 पासून मासिक हप्ते देखील निवडू शकता. या बद्दल आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे माहिती मिळवू शकता…
ग्रँड विटाराच्या बेस व्हेरियंटचे फीचर्स :-
सिग्मा हा ग्रँड विटाराचं सर्वात स्वस्त व्हेरियंट आहे आणि या व्हेरियंटमध्ये LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRL), LED पोझिशन लाईट्स, टर्न इंडिकेटरसह ORVM, शार्क फिन अँटेना, सिल्व्हर अँटीक्सेंटसह ड्युअल-टोन ब्लॅक आणि बोर्डो इंटीरियर आणि ब्लॅक फॅब्रिक डोअर आर्मरेस्ट मिळते.
4.2 इंच TFT कलर इन्फॉर्मेशन डिस्प्ले, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कमांड्स, कीलेस एंट्री, क्रोम इनडोअर डोअर हँडल, स्पॉट मॅप लॅम्प (रूफ फ्रंट), स्टोरेजसह फ्रंट स्लाइडिंग आर्मरेस्ट, पुश स्टार्ट/स्टॉप बटण यांसारखी जबरदस्त फीचर्स अन् तेही 10 लाखांत..
याशिवाय, केबिन कुल ठेवण्यासाठी, ऑटो एसी, बॅक एसी व्हेंट्स, ड्रायव्हर सीट्स हाईट्स कंट्रोल, 60:40 फोल्डिंग रियर (बॅक) सीट्स, रिक्लाइनिंग रिअर सीट्स, ड्रायव्हर साइड ऑटो अप/डाउन पॉवर विंडो, इलेक्ट्रिक फोल्डिंग ORVM, ड्रायव्हर आणि व्हॅनिटी मिरर, सेंटर कन्सोल अँक्सेसरीज सॉकेट, गियर शिफ्ट इंडिकेटर, ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
ग्रँड विटाराच्या टॉप व्हेरियंटचे फीचर्स :-
Alpha+ अर्थात ग्रँड विटाराच्या टॉप व्हेरियंटमध्ये काही इतर फीचर्स देखील देण्यात आली आहेत. ज्यामध्ये LED हेडलाइट्सवर क्रोम प्लेटिंग, शॅम्पेन गोल्ड अँक्सेंटसह ऑल-ब्लॅक इंटीरियर, IP लाइन अँम्बियंट लाइटिंग, 7-इंच TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लॅक लेदर सीट्स, आर्मरेस्टवर शिलाई असलेले ब्लॅक PVC डोअर, पोंड लॅम्प, व्हेंटिलेटेड सीट्स, हेडलॅम्प्स यांचा समावेश आहे. हेड–अप डिस्प्ले, प्रीमियम साउंड सिस्टम, TPMS यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
सेफ्टीसाठी आहेत कमालीचे फीचर्स :-
या व्हेरियंटमध्ये कंपनीने सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली आहे. 6 एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, ESP, हिल होल्ड असिस्ट, फोर्स लिमिटर्ससह फ्रंट सीटबेल्ट प्री-टेन्शनर, फ्रंट सीट बेल्टमध्ये अँडजस्टेबल शोल्डर अँकर, थ्री पॉइंट ELR सोबत ऑल सीट बेल्ट, ISOFIX, डे/नाईट अँडजस्टेबल IRVM, कमी इंधनसाठी वॉर्निंग लॅम्प रिमायंडर / डोअर बजर / हेडलॅम्प ऑन सारखे फीचर्स मिळतात.
थेट होणार या SUVs शी स्पर्धा :-
Maruti Suzuki Grand Vitara ची सर्वात मोठी स्पर्धा मार्केटमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या Hyundai Creta शी आहे, ज्याची किंमत रु. 10.44 लाख ते रु. 18.24 लाख आहे. Hyundai Creta भारतीय मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह एकूण 6 व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. SUV 1.5 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि डिझेल तसेच 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनची ऑप्शन देते. मारुती विटारा आणि क्रेटा यांच्या किमतीत फारसा फरक नसला तरी विटाराचे हायब्रीड व्हर्जन आणि जबरदस्त मायलेजमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे.