Take a fresh look at your lifestyle.

CNG मध्ये ‘हे’ आहेत टॉप 5 कार, 35KM पेक्षा मिळेल जास्त मायलेज…

0

शेतीशिवार टीम, 18 फेब्रुवारी 2022 : पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी वाहने अधिक फ्यूल एफिशिएंट असली तरी पर्यावरणासाठीही चांगली मानली जात आहे. मारुती (Maruti) ते ह्युंदाई (Hyundai) आणि टाटा (Tata) सारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या काही मॉडेल्ससह फॅक्टरी फिटेड सीएनजी (CNG) सुविधा देत आहेत. 

सध्या राज्यात CNG ची किंमत प्रति किलो ₹ 56.01 रुपये आहे, तर पेट्रोल ₹109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल ₹ 94.13 रुपये प्रति लिटर आहे. जर तुम्ही स्वतःसाठी चांगली सीएनजी (CNG) कार घेण्याचा विचार करत असाल, तर आपण तुमच्यासाठी असलेले 5 सर्वोत्तम ऑप्शन जाणून घेणार आहोत….

टाटा टियागो (Tata Tiago iCNG ) :-

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या Tiago हॅचबॅक कारचा iCNG व्हेरियंट लॉन्च केला आहे. विशेष बाब म्हणजे ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीत (Global NCAP crash test) मध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. तुम्हाला टियागोच्या बेस, मिड आणि टॉप व्हेरियंटमध्ये CNG ऑप्शन मिळणार आहे. टाटा मोटर्सने XE, XM, XT आणि XZ+ या चार व्हेरियंटमध्ये Tiago CNG लाँच केले आहे. त्याची किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरू होऊन 7.52 लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा मोटर्सने Tiago iCNG मध्ये कॉस्मेटिक बदल केले आहेत. तसेच कंपनीने या सीएनजी (CNG) कारमध्ये 1.2 लीटर रेवोट्रॉन इंजिन दिलं आहे, जे 73ps पॉवर जनरेट करतं.

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro) :-

Hyundai Santro ही भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी कारमध्ये गणली जाते. नव्या Hyundai Santro मॅग्ना (Magna) आणि Sportz (Sportz) ट्रिम्समध्ये CNG ऑप्शनसह येते. Hyundai Santro मध्ये 1.2-liter 4-सिलेंडर इंजिन आहे. ज्यासोबत CNG किटचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. त्याची किंमत 6.38 लाख रुपये (Ex-showroom) आहे. स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल बटण, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यासारखे कमालीची फीचर्स Santro CNG कारमध्ये उपलब्ध आहेत. Hyundai Santro चा CNG व्हेरियंट 60 PS पॉवर आणि 85 Nm टॉर्क जनरेट करते.

ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) :-

खऱ्या अर्थाने कारची खरी अनुभूती तर सेडान (Sedan) मधूनच येते. लांब आणि तिरकस डिझाईन असलेली ही सेडान कार तुम्हाला प्रीमियम फील तसेच एलिट फील देते.

कंपनीने ह्युंदाई ऑरा पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.2-लिटर इंजिन वापरलं आहे, जे 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 100PS पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे 1.2 लीटर डिझेल इंजिन 75PS पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. एकूण पाच व्हेरियंट मध्ये येत असलेल्या या कारची किंमत 5.97 लाख ते 9.35 लाख रुपये आहे. त्याच्या CNG व्हेरियंट ची किंमत 7.74 लाख रुपये (Ex-showroom) आहे. ही कार मारुती सुझुकी डिझायर आणि होंडा अमेझला थेट टक्कर देते. CNG व्हेरियंट मध्ये ही कार 28KM पर्यंत मायलेज देते.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) :-

जर तुम्हाला शानदार मायलेज असलेले सीएनजी वाहन हवं असेल तर मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) हा एक उत्तम ऑप्शन असेल. मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी (CNG) ऑप्शनमध्ये 35.6 Km वेगाने धावते. मात्र, CNG किट या कारच्या VXI व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याची किंमत 6.58 लाख रुपये (Ex-showroom) आहे.

यात 999cc इंजिन आहे. यात सेंट्रल लॉकिंग, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अँडजस्टेबल विंग मिरर आणि स्प्लिट-फोल्डिंग रिअर सीट्स मिळतात. सुरक्षा फीचर्समध्ये ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि मागील पार्किंग सेन्सर समाविष्ट आहेत…

मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) :-

हॅचबॅक आणि सेडान व्यतिरिक्त, जर तुम्हाला सीएनजीसह (CNG) सात सीटर वाहन हवे असेल तर मारुती सुझुकी एर्टिगा हा एक शानदार ऑप्शन आहे. ही सीएनजी व्हेरियंट 1 किलोमध्ये 26 किमी पेक्षा जास्त धावते. Maruti Suzuki Ertiga CNG ची किंमत 9.87 लाख रुपये आहे. या MPV मध्ये सेंट्रल कन्सोल-माउंटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वुडन फिनिश डॅशबोर्ड, अँडजस्टेबल सेकंड-रो एसी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.