थंडीत दबलेल्या / आखडलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी ‘हे’ 3 आयुर्वेदिक उपाय करून पहा !

0

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : कडाक्याच्या थंडीत अनेक वेळा आपल्या ब्लड सेर्कुलशन मध्ये काही समस्या निर्माण झाल्याने आपल्या नसा घट्ट आणि त्यामध्ये अडथळे येत असतात. त्यामुळे आपल्या शरीरावर खुप वाईट परिणाम होतो.

आपल्या पायातील शिरामध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्याने चालताना त्रास होणे, धाप लागणे, चक्कर येणे इ. लक्षणे जाणवतात.

पण आज आम्ही तुम्हाला मज्जातंतूंचा अडथळा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यातून तुम्हाला या आजारापासून लवकरच आराम मिळू शकतो…

जर नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या असेल तर जेवणात लसणाचा वापर करा यामुळे लसूण खाल्ल्याने नसांची रुंदी वाढते. तसेच हे नसा उघडण्यासही सक्षम आहे. लसणाच्या 2/3 पाकळ्या भाजून त्याला बारीक करा अन् 1 ग्लास कोमट दुधात लसूण मिसळून त्याचे सेवन करा. तुम्हाला अराम मिळेल.

हळदीचा वापर करून, तुम्ही बंद झालेल्या नसती उघडू शकता, कारण हळदीमध्ये कर्क्युमिन अँटी-इंफ्लेमेटरी गुण असून जे रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून प्रतिबंधित करते,त्यामुळे तुम्ही चिमुट्भर हळद / एक चमचा मध / एक ग्लास कोमट दुधात घेतल्याने बंद झालेल्या नसा मोकळ्या होतील.

फ्लेक्ससीड (जवसाच्या बिया ) नसांमधील ब्लॉकेज उघडण्यास देखील सक्षम आहे, त्यामध्ये अल्फा लिनोलेनिक अँसिड मुबलक प्रमाणात असतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल सहजपणे बाहेर पडतं, ज्यामुळे ब्लड सेर्कुलशन योग्य प्रकारे सुरू होतं. याच्या वापरासाठी रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करून त्याचा काढा बनवा आणि सलग 3 महिने हा प्रयोग केल्यास फायदा होतो.

डाळिंबाचे सेवनानेहीचांगला फायदा होतो, रोज सकाळी 1 ते 2 डाळिंबे खावीत…

Leave A Reply

Your email address will not be published.