शेतीशिवार टीम, 22 डिसेंबर 2021 :- तुम्ही कधी बेंबी मध्ये तूप आणि विविध प्रकारचे तेल लावल्याने होणारे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण बेंबीत हळद लावल्याने होणारे फायदे तुम्ही ऐकले आहेत का? हळदीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक असतात. हे अँटीबैक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे, जे पचन आणि त्वचेच्या समस्यांसाठी देखील प्रभावी आहे. हळदी पासून अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये तसेच पेस्टही लावली जाते.

1) इम्यूनिटी सिस्टमसाठी फायदेशीर :-

रात्री बेंबीत हळद टाकून झोपल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहील आणि वजन कमी करण्यातही ते प्रभावी ठरेल.

2) पचनसंस्थेला मदत करते :-

पाचन तंत्र शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही तर शरीरात अनेक आजार उदभवू शकतात आणि हळदीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते हे आपल्याला माहीत आहे. फायबर हे अन्न पचनासाठी आवश्यक घटक आहे. त्यामुळे पोटदुखी किंवा अपचन झाल्यास बेंबीवर हळद लावून आराम करू शकता.

3) संसर्गापासून संरक्षण मिळते :-

हळदीमध्ये अँटी-बैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे हिवाळ्याच्या काळात अनेक विषाणूजन्य आजार आणि सर्दी बरे होण्यास मदत होते. हळद आणि मोहरीचं तेल बेंबीवर लावल्याने आजार दूर राहतात. याशिवाय सर्दी-खोकल्यातही लवकर आराम मिळतो.

4) पीरियड्स वेदनांन पासून आराम :-

अनेक स्त्रिया मासिक पाळीत पोटदुखी आणि पेटके येण्याची तक्रार करतात. बेंबी हे आपल्या शरीराचे मुख्य केंद्र आहे. अशा स्थितीत बेंबीमध्ये हळद लावल्यास मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थतेमध्ये देखील फायदा होतो.

हळद अशी लावावी :-

रात्री झोपताना किंवा जेव्हा तुम्ही किमान 1-2 तास विश्रांती घेणार असाल तेव्हा नेहमी बेंबीमध्ये हळद लावा जेणेकरून तुमचे शरीर बेंबीद्वारे हळदीचं गुणधर्म शोषून घेईल. बेंबीमध्ये मोहरीचं तेल किंवा खोबरेल तेलात हळद मिक्स करून लावावी , कारण तेलात मिसळल्यावर हळदीचे गुणधर्म त्वचेवर लवकर काम करू लागतात. पोटदुखीची तक्रार असल्यास नाभीत हळद लावल्यानंतर हलक्या हातांनी पोटाची मालिशही करू शकता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *