शेतीशिवार टीम, 17 जानेवारी 2022 : Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी बद्दल तुम्हाला तर माहितीच असेल हे मार्केट जोखमींनी भरलेलं असतं. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत काहीही सांगता येत नाही, क्वचितच कोणी त्याचा अंदाज लावू शकेल. म्हणजे व्हायचं असेल एका क्षणात माणूस करोडपती होऊ शकतो अन् एका क्षणात रोडपती व्हायलाही वेळ लागत नाही.
परंतु आजकाल क्रिप्टो मार्केट (Crypto market) रिकव्हरी पाहाययास मिळत आहे. याच दरम्यान आणखी एका अनामिक क्रिप्टो टोकनने (Crypto Token) गुंतवणूकदारांना Multibagger return देऊन आश्चर्यचकित केलं आहे.
गुंतवणूकदार फक्त 7 दिवसात झाले करोडपती :-
या अनामिक क्रिप्टो टोकनचे नाव आहे – एकता (Ekta) .सध्या या टोकनबाबत फार काही स्पष्ट नसलं तरी गेल्या 7 दिवसांत या टोकनने दिलेल्या मल्टीबॅगर रिटर्न्समुळे चर्चेत आलं आहे. coinmarketcap.com च्या मते, एकताने गेल्या सात दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 2,893,266,376% इतका जबरदस्त रिटर्न्स दिले आहे. याचा अर्थ या टोकनने फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 2,989.32 कोटी रुपयांमध्ये केलं आहे.
जाणून घ्या या क्रिप्टो टोकन बद्दल…
एकता हे एक ब्लॉकचेन चलन आहे. अलीकडेच सीड फंडिंग आणि खाजगी विक्रीतून $5 दशलक्ष पेक्षा जास्त जमा केले आहे. परंतु, या टोकनचे मार्केट कॅप $5 दशलक्ष पेक्षा कमी आहे. ट्रेड व्हॉल्यूममध्ये 92% घट झाली आहे. coinmarketcap वरील डेटातील आकडेवारीनुसार क्रिप्टोकरन्सीची टोटल सप्लाई 12,097,924 आहे आणि मॅक्झिमम लिमिट 420,000,000 टोकन आहे.
क्रिप्टो मार्केट :-
संपूर्ण जगात क्रिप्टोची सर्वात मोठी बाजारपेठ ही भारतात आहे. गेल्या 2 वर्षात भारतातील जितक्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली नाही त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोकांनी क्रिप्टोमध्ये (Crypto market) गुंतवणूक केली आहे. भारतात सुमारे 100 दशलक्ष क्रिप्टो गुंतवणूकदार (Crypto investors) आहेत. सध्या तरी भारतात क्रिप्टोवर कोणतेही नियमन किंवा बंदी घालण्यात आलेली नाहीये.