Take a fresh look at your lifestyle.

UPSC Tricky Interview Questions : माणसाला जेव्हा विजेचा धक्का बसतो तेव्हा शरीरात असं काय होतं की मृत्यू ओढवतो ?

0

शेतीशिवार टीम, 11 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता ?
उत्तर- डॉल्फिन (Dolphin) हा मानवानंतरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे.

प्रश्न- आंबट मध जगातील कोणत्या देशात आढळतो ?
उत्तर- ब्राझील

प्रश्न- भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?
उत्तर- सरोजिनी नायडू ( उत्तरप्रदेश )

प्रश्न : 11+11= 4
12+12 = 9
13+13 = ?
उत्तर : 16

प्रश्न : असा कोणता पक्षी आहे जो कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही ?
उत्तर :  असा एक पक्षी आहे जो कधीही पृथ्वीवर पाय ठेवत नाही, या पक्ष्याचे नाव ‘हरियाल पक्षी’ (Green bird) आहे जो कबुतराचा एक प्रकार असून हा महाराष्ट्राचा राजकीय पक्षी आहे.

प्रश्न : अमेरिकेच्या आधार कार्डला काय नाव आहे ?
उत्तर : ग्रीन कार्ड (Green card)

प्रश्न : पार्ले G मध्ये G चा अर्थ काय आहे ?
उत्तर : पार्ले जी बिस्किट मध्ये G चे अनेक अर्थ लावले आहे. पार्ले प्रमाणे G ला ग्लुको म्हणजे (Glucose) असे 1980 पर्यंत म्हटले जायचे. नंतर त्याला G फॉर जीनियस असेही म्हटले गेलं.

प्रश्न : मानवी शरीरातील मेंदू किती वॅट वीज निर्माण करू शकतो ?
उत्तर : 12 ते 15 वॅट

प्रश्न : विमानाचा रंग हा पांढराचं का असतो ?
उत्तर : विमान थंड ठेवण्यासाठी ते पांढर्‍या रंगाने रंगवलेलं असतं, त्यामुळे ते सूर्यप्रकाशात तापत नाही, उन्हाळ्यात पांढर्‍या रंगामुळे बाकीच्या रंगाच्या तुलनेत गरम हवा विमानापासून दूर राहते.

प्रश्न : सर्च (Search) आणि रिसर्च (Research) मध्ये नेमका काय आहे फरक ?
उत्तर : सर्च म्हणजे तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे होय.
तर रिसर्च म्हणजे नवीन विषयावर शोध घेणे किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन माहिती गोळा करणे.

प्रश्न – माणसाला जेव्हा विजेचा धक्का बसतो तेव्हा शरीरात असं काय होतं की मृत्यू ओढवतो ?

उत्तर – जेव्हा मानवी शरीराला विजेचा झटका किंवा करंट लागतो. तेव्हा वीज मानवी शरीरात असलेलं पाणी पूर्णपणे जाळून टाकते. आपल्या शरीरात 70% पाणी असतं. पाणी जाळल्यामुळे माणसाचं रक्त घट्ट होतं अन् रक्ताचा प्रभाव मंदावतो. यानंतर व्यक्तीचे सर्व अवयव काम करणं बंद करतात. या अवस्थेत व्यक्तीचा मृत्यू होतो.

एखाद्या व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने तीन मार्गाने मृत्यू होऊ शकतो :-
श्वास रोखल्याने
हृदय बंद पडल्याने
फुफ्फुस निकामी झाल्याने

प्रश्न : नवजात बाळा च्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असतं ?
उत्तर : 270 ML

प्रश्न : असं कोणतं फळ आहे, जे पिकायला 2 वर्षे लागतात ?
उत्तर : अननस

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, जो जिभेने स्वतःचं कान स्वच्छ करू शकतो ?
उत्तर : जिराफ (Giraffe) जिराफ हा एकमेव प्राणी आहे जो आपल्या जिभेने कान स्वच्छ करू शकतो. जिराफाची जीभ आणि कान लांबच असतात असे नाही तर त्याचे पायही लांब असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की जिराफ हा जगातील सर्वात लांब प्राणी आहे.

प्रश्न : देशातलं पाहिलं वृत्तपत्र कधी व कोणतं प्रकाशित झालं ?
उत्तर : देशातील पहिले वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी प्रकाशित झालं. हे बंगाल गॅझेटियर (Bengal Gazetteer) म्हणून ओळखले जात असे.

प्रश्न : भारतातील सर्वात उंच इमारत कुठे आहे अन् तिचं नाव ?
उत्तर : आत्तापर्यंत भारतातील सर्वात उंच इमारती ही इम्पीरियल टॉवर (Imperial Tower) आहे, ज्याची उंची 833 फूट आहे आणि त्याला 61 मजले आहेत. आता मुंबईतच वर्ल्ड वन World One ही 117 मजली इमारत बांधण्यात आली आहे, जी भारतातील सर्वात उंच इमारत मानली जाते. विकिपीडियानुसार, त्याची लांबी 8000 मीटर आहे आणि त्यात एकूण 76 मजले आहेत.

प्रश्न – जन्मापासून तर मरेपर्यंत शरीराचा असा कोणता पार्ट आहे जो कधीच वाढत नाही ?
उत्तर – फक्त ‘डोळा’ हा एक अवयव आहे जो कधीही वाढत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.