Take a fresh look at your lifestyle.

IAS Interview Questions : तुमच्या पत्नीचं दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचं तुम्हाला कळलं, तर तुम्ही काय कराल ?

0

शेतीशिवार टीम,22 डिसेंबर 2021 :- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : जर तुम्हाला भूक लागली असेल आणि पैसे नसतील तर तुम्ही अन्न चोराल का ?

उत्तर : काही लोक उपाशी असल्यास चोरी करण्याचं धाडस करतात. परंतु ते हे विसरतात की, चोरी करणं कायद्यानं गुन्हा आहे. अशा स्थितीत उमेदवाराने हुशारीने उत्तर दिलं, तो म्हणाला – सर, कोणतंही छोटं काम करून स्वत:च्या मेहनतीने एक वेळचं जेवण मिळवलं जाऊ शकतं. एखादं काम मागणं चोरी करण्यापेक्षा चांगलच….

प्रश्न : जर एखाद्या अल्पवयीन मुलाने खून केला तर तर त्याला काय शिक्षा होईल ?

उत्तर : नवीन कायद्यानुसार, अल्पवयीन गुन्हेगारांचं वय 18 वरून 16 करण्यात आलं आहे. कलम 82 नुसार, 7 वर्षाखालील आणि 83 नुसार 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा नाही. अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास किमान 3 वर्षे आणि कमाल 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.

प्रश्न : असं काय आहे जे बाहेर फुकट अन् दवाखान्यात पैसे देऊन मिळतं ?

उत्तर : ऑक्सीजन

प्रश्न : तुमच्या पत्नीचं दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचं तुम्हाला कळलं, तर तुम्ही काय कराल ?

उत्तर : सर, मी गैर-पुरुषावर माझ्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करून अँडल्टरी कलम 497 मधील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करेन. या कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच, मी माझ्या पत्नीला समजवण्याचा देखील प्रयत्न करेन, जेणेकरून आमचं नातं पुन्हा पूर्ववत होईल.

प्रश्न : टेलिफोनच्या डायलिंग पॅडच्या सर्व अंकांचा गुणाकार केला तर उत्तर काय येईल ?

उत्तर : झिरो

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी तुमची आहे परंतु इतरांद्वारे वापरली जाते ?

उत्तर : नाव

प्रश्न : इंग्रजी येत नसेल तर प्रशासन कसे चालवणार ?

उत्तर : हा प्रश्न आयएएस अधिकारी मनोज कुमार यांना विचारण्यात आला, प्रश्न विचारल्यानंतर इंटरव्यूअरने सांगितलं की, तुम्ही पाणी प्या. त्याने हुशारीने उत्तर दिलं. तो म्हणाला, हे पाणी तर काचेच्या ग्लासात आहे. मी ते पिणार नाही. मी फक्त स्टीलच्याच ग्लासात पाणी पितो.

या उत्तरावर इंटरव्हिव्ह बोर्ड संतप्त झालं. त्याचं पाण्यावरचं उत्तर ऐकून इंटरव्हिव्ह बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले – काय मूर्खपणा करताय. यावर तो म्हणाला – सर, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, पाणी महत्त्वाचं आहे , ग्लास नाही. जसं की काम करण्यासाठी भाषाची गरज नाही तर गरज आहे, कामाची अन् त्याला लागणाऱ्या कौशल्याची….

प्रश्न : प्रामाणिकपणा कशाला म्हणतात ; एखादं उदाहरण सांगून स्पष्ट करा ?

उत्तर : मी एका दुकानात भाजी घेत आहे, आणि पैसे घेताना दुकानदार एका वस्तूचं पैसे मोजायला विसरतो. पण जर मी त्याला या गोष्टीची आठवण करून देत त्या वास्तूचे पूर्ण पैसे देत आहे. तर हा माझा प्रामाणिकपणा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.