शेतीशिवार टीम,22 डिसेंबर 2021 :- हाय ब्लड प्रेशर किंवा हाइपरटेंशन ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणारी गंभीर आरोग्य समस्या आहे. आरोग्य तज्ज्ञ याला ‘सायलेंट किलर’ म्हणून वर्गीकृत करतात. हाय ब्लड प्रेशर ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये धमनीच्या भिंतींवर रक्ताचा दाब वाढतो, ज्यामुळे धमन्या फुटण्याचा आणि हृदय कॅन्सर, हार्ट अटॅकची अनेक पटींनी समस्यां वाढते . जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की जगभरात 30-79 वर्षे वयोगटातील 128 दशलक्षाहून अधिक लोक या गंभीर समस्येचे बळी आहेत.
हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी विविध उपचार पद्धती आणि औषधे उपलब्ध आहेत. तरी पण, आरोग्य तज्ञांच्या मते, रुग्णांनी औषधांपेक्षा त्यांची दैनंदिन जीवनात निश्चित करून त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. याशी संबंधित हार्वर्ड तज्ञांनी अलीकडेच असे तीन उपाय शेअर केले आहेत, हे लक्षात घेऊन आरोग्याच्या या गंभीर समस्येवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
निरोगी जीवनशैली राखणे महत्वाचं :-
हार्वर्डच्या तज्ज्ञांच्या मते, हाय ब्लड प्रेशरची समस्या केवळ औषधांनी बरी होऊ शकत नाही, यासाठी तुम्हाला जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक वनस्पती-आधारित आहार घेतात आणि नियमित व्यायाम करतात त्यांना हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका कमी असतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हाय ब्लड प्रेशरची समस्या टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे खूप गरजेचं आहे.
औषध घेताय म्हणून बेफिकीर राहू नका :-
हार्वर्ड तज्ञांच्या म्हणण्यानुसार,ब्लड प्रेशरची अनेक औषधांमुळे सहसा दुष्परिणाम दिसून येऊ शकतो, नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs), अँटीडिप्रेसंट्स आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स यांसारख्या औषधांच्या अतिवापरामुळे देखील हाय ब्लड प्रेशर चा धोका अधिक होऊ शकतो. यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
आरोग्याची विशेष काळजी घ्या :-
तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा, स्लीप एपनिया, किडनीच्या समस्या, हार्मोनल इनबॅलन्स यासारख्या अनेक प्रकारच्या अंतर्निहित आरोग्य स्थितींमुळेही हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. म्हणूनच अंतर्निहित आरोग्य स्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कृपया याबाबत आरोग्य तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घ्यावा.
या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे :-
हार्वर्ड तज्ञांच्या मते, ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे किंवा ज्यांना हाइपरटेंशनचा धोका जास्त आहे, त्यांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
1)शरीर नेहमी अँक्टिव्ह ठेवा, शारीरिक व्यायाम नियमित करा.
2) तुमच्या ब्लड प्रेशरचा लेव्हलवर लक्ष ठेवा. कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
3) ताणतणाव घेतल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचा धोकाही असतो. योग, ध्यानधारणा, अरोमाथेरपी इत्यादी तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात.
4) फळे, भाज्या, शेंगदाणे, कडधान्य, पोल्ट्री यांसारख्या निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन करा.
5) जास्त मीठ, साखर किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा.