Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview Questions : भारतातील असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे, तिथे फक्त महिला कर्मचारी आहेत

0

शेतीशिवार टीम, 27 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : भारतातील असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे, तिथे फक्त महिला कर्मचारी आहेत ?
उत्तर : “मांटुंगा रेल्वे स्टेशन” हे भारतातील पाहिलं रेल्वे स्टेशन आहे. जिथे फक्त महिलाराज आहे.
यानंतर मणिनगर रेल्वे स्टेशन (अहमदाबाद)
चंद्रागिरी रेल्वे स्टेशन (आंध्रप्रदेश)
अजनी रेल्वे स्टेशन (नागपूर)
गांधी नगर रेल्वे स्टेशन (जयपुर)

प्रश्न : असा कोणता देश आहे, जो कधीच कोणत्याही देशाचा गुलाम झाला नाही ?
उत्तर : “नेपाळ” हा जगातील एकमेव देश आहे, जो कधीही इतर कोणत्याही देशाचा गुलाम बनला नाही. हे नेहमीच आझाद राहिला आहे.

प्रश्न : काळ्या रंगाचं गुलाब कोणत्या देशात आढळतं?
उत्तर : गुलाब हे प्रत्येकाचं आवडतं फूल आहे. आणि काळ्या रंगाचं गुलाब हे “तुर्की” देशात आढळतं

प्रश्‍न : असं काय आहे जे रात्रंदिवस फिरतचं राहतं ?
उत्तर: “घड्याळ अन् वेळ” अशा दोन गोष्टी आहेत, ज्या सतत फिरत राहतात, कधीही थांबत नाही…

प्रश्न : आपल्या मणक्यांमध्ये किती हाडे असतात ?
उत्तर : मणक्यातील हाडांची संख्या ही ’33’ आहे.

प्रश्न: भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मंदिरे आहेत ?
उत्तर: तसं पाहिलं तर, भारत आपल्या परंपरा आणि चालीरीतींमुळे जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. आणि भारतातल्या प्रत्येक राज्यात मंदिरे आहेत. पण “तामिळनाडू” हे भारतातील असे राज्य आहे, जिथे सर्वाधिक मंदिरे आहेत.

प्रश्न : कतार या देशाचे रस्ते निळे असतात, यामागचं कारण काय ?
उत्तर : साधारणपणे आपण सर्वत्र रस्त्यांचा ‘काळा रंग’ पाहिला आहे. पण कतार हा असा देश आहे, जिथे रस्त्यांचा रंग निळा आहे. कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि विकिरित करतो. तर निळा लेप सूर्यापासून उत्सर्जित होणारे किरणोत्सर्ग 50% कमी करू शकतो. त्यामुळे तेथील तापमानात घट होते.

प्रश्न : जगातील सर्वात मोठं फुल कोणतं, त्या फुलाचं नाव काय आहे ?
उत्तर : जगातील सर्वात मोठ्या फुलाचे नाव “रॅफ्लेसिया अर्नोल्डी फ्लॉवर” (Stinking corpse lily) आहे. आणि हे दुर्मिळ महाकाय फूल इंडोनेशियाच्या वर्ष जंगलात आढळते. ते तीन फुटांपर्यंत वाढू शकते. तसेच, त्याचे वजन 15 पौंडांपर्यंत असू शकते. या फुलाला पाने नसतात. तसेच कोणतेही मूळ नाही. तसेच ही एक परोपजीवी वनस्पती आहे.

प्रश्न : जगातील सर्वात लांब स्ट्रेट रस्ता किती Km आहे आणि तो कुठे आहे ?
उत्तर : सौदी अरेबियातील महामार्ग 10 हा पृथ्वीवरील सर्वात लांब सरळ (Straight) रस्ता आहे. हरध ते अलबादा हे सुमारे 254 किलोमीटर इतकं लांब अंतर आहे.

प्रश्न : भारतातलं असं कोणतं राज्य आहे जे कधीच इंग्रजांचं गुलाम बनलं नाही ?
उत्तर : गोवा
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाही गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. भारत सरकारच्या अनेक विनंत्या करूनही पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नव्हते.
त्यामुळे 19 डिसेंबर 1961 रोजी ‘विजय’ नावाचं लष्करी ऑपरेशन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये पोर्तुगालच्या गव्हर्नर जनरलने भारतीय लष्करी कमांडरसमोर आत्मसमर्पण केलं. आणि त्यानंतर 1987 मध्ये गोव्याला भारतीय राज्याचा दर्जा देण्यात आला. म्हणूनच दरवर्षी 19 डिसेंबर हा गोव्यात “गोवा मुक्ती दिन” म्हणून साजरा केला जातो.

प्रश्न : पाकिस्तानच्या तुरुंगात 29 वर्षे घालवून कोणती व्यक्ती भारतात परतली ?
उत्तर : “कुलदीप सिंग” हा असा भारतीय आहे, ज्याने आपल्या आयुष्याची 29 वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात घालवली. आणि नंतर भारतात परतले.

प्रश्न : मानवी शरीराचा असा कोणता अवयव आहे, जो मेंदूची सर्वाधिक ऊर्जा वापरतो ?
उत्तर : “डोळा” हा मानवी शरीरातील असा अवयव आहे, जो मेंदूची 65% ऊर्जा युज करतो. जो इतर कोणत्याही अवयवापेक्षा जास्त आहे…

प्रश्न : मानवी ह्दय दर मिनिटाला किती वेळा धडकतं ?
उत्तर : 72

प्रश्न : भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?
उत्तर : 17

प्रश्न : चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता ?
उत्तर : चीन

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे त्याचं रक्त हिरवं असतं ?
उत्तर : न्यू गिनी नावाच्या गिरगिटाला हिरवे रक्त असते. हिरव्या रक्तामुळे त्याचे स्नायू आणि जीभही हिरवी असते.

प्रश्न : अंड्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
उत्तर : अंड्याचे बाह्य कवच कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेलं असतं, त्याचे रासायनिक सूत्र CaCO3 आहे.

प्रश्न : टॉम आणि जेरी कार्टून कोणी तयार केलं ?
उत्तर : टॉम अँड जेरी (Tom and Jerry) ही विल्यम हॅना (William Hanna) आणि जोसेफ बारबेरा (Joseph Barbera) यांनी तयार केलेली 1940 च्या कॉमेडी चित्रपटांची अमेरिकन अँनिमेटेड सिरीज आहे.

प्रश्न : बॉलीवूड इंडस्ट्रीची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर : 1930 मध्ये बॉलीवूडची स्थापना झाली, 1934 मध्ये हिमांशू राय यांनी सुरू केलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये (Bombay Talkies) भारतीय सिनेमाच्या विकासाला वेग आला.

प्रश्न : सूर्य सर्वात आधी कुठे उगवतो अन् कुठे मावळतो ?
उत्तर : नॉर्वेला (Norway) मावळत्या सूर्याचा देश म्हणतात कारण, तिथे सूर्य सर्वात आधी नॉर्वेत मावळतो. तर सर्वात आधी सूर्य उगवतो तो देश म्हणजे जपान होय. ..

प्रश्न : IQ चा फुल फॉर्म आणि त्याचा अर्थ काय आहे ?
उत्तर : IQ चे फुल फॉर्म म्हणजे Intelligence Quotient.(IQ) ही बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रमाणित टेस्टिंगमधून काढलेली गणना आहे. ‘IQ’ हा शब्द जर्मन शब्द Intelligenz-Quotient पासून आला आहे, 1912 मध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी 20 व्या शतकाच्या सुरूवातीस आधुनिक मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पद्धतींसाठी प्रथम वापरला. परंतु आजही “IQ” हा शब्द अजूनही जगभरात सगळीकडे वापरला जातो.

प्रश्न : एक लीटरमध्ये हेलिकॉप्टर नेमकं किती मायलेज देतं ?
उत्तर : हेलिकॉप्टर एका तासात 50 लिटर ते 60 लिटर इंधन वापरते. आणि एक मैल उडण्यासाठी 1 गॅलन इंधन लागतं. त्याची सरासरी काढण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 180 किलोमीटर मानला, तर हेलिकॉप्टर 1 लिटर इंधनात 3 ते ४ किलोमीटर उडू शकतं.

प्रश्न : भारतात पहिला कोरोना रुग्ण कधी आढळला ?
उत्तर : 30 जानेवारी 2020

प्रश्न : जगातील सर्वात पहिली सेल्फी कोणी घेतली होती ?
उत्तर : जगातील सर्वात पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कार्नेलियस या व्यक्तीने घेतली होती.

प्रश्न : आपली नखे कशापासून बनलेली असतात ?
उत्तर : नखे केराटिन (Keratin) नावाच्या पदार्थाने बनलेले असतात, जो कठोर आणि मृत प्रोटिन्सने बनलेला सिंग सारखा पदार्थ असतो.

प्रश्न : भारतीय नोटेवर गांधीजींचे फोटो कधी छापण्यात आला ?
उत्तर : 1969 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींचा फोटो असलेली 100 रुपयांची पहिली नोट जारी केली. यामध्ये गांधीजींना सेवाग्राम आश्रमासमोर बसलेले दाखवण्यात आले आहे.
… तर ऑक्टोबर 1987 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नोट जारी केली ज्यामध्ये महात्मा गांधींचे हसरे चित्र होते. त्यावर सिंहाची राजधानी आणि अशोक स्तंभावर वॉटर मार्क होते.

प्रश्न : क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला षटकार कोणी मारला होता ?
उत्तर : क्रिकेटमधील पहिला षटकार ऑस्ट्रेलियन खेळाडू चार्ल्स बॅनरमन (Charles Bannerman) याने 3 जून 1877 रोजी मारला होता.

प्रश्न : ताजमहाल मुमताजच्या मृत्यूपूर्वी बांधला गेला की नंतर?
उत्तर : मुमताज महल यांचा मृत्यू 17 जून 1631 रोजी बुरहानपूर येथे मुलगी गौरा बेगमला जन्म देताना झाला. त्यानंतर मुमताज महलच्या स्मरणार्थ शाहजहानने ताजमहाल बांधला जो 1634 मध्ये पूर्ण झाला.

प्रश्न : असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे जे अर्ध महाराष्ट्रात आहे अन् अर्ध गुजरातमध्ये आहे ?
उत्तर : नवापूर हे सुरत-भुसावळ मार्गावरील असे एक स्थानक आहे, जेथे स्थानकाच्या मध्यभागी दोन राज्यांच्या सीमा मिळतात. त्यामुळे या स्थानकाचा अर्धा भाग गुजरातमध्ये आहे, तर उर्वरित अर्धा भाग महाराष्ट्रात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.