शेतीशिवार टीम, 9 एप्रिल 2022 :- UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : जगातील सर्वात महाग रक्त कोणाचं आहे ?
उत्तर :  जगातील सर्वात महाग रक्त हे खेकड्याचं आहे, त्याला हॉर्सशू क्रैब (Horseshoe crab) असंही म्हणतात. या खेकड्याचं रक्त निळ्या रंगाचं असून याला आंतराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. आंतराष्ट्रीय बाजारात या निळ्या रंगाच्या रक्ताची किंमत 11 लाख रुपये इतकी आहे. याचा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो.

प्रश्न : उंट हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ?
उत्तर : उंट हा कुवैत (Kuwait) चा राष्ट्रीय प्राणी मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणात उंट आढळतात.

प्रश्न : असा कोणता देश आहे, तिथे महिलेला 7 पेक्षा जास्त मुले असल्यास सुवर्णपदक दिलं जातं ?
उत्तर : कझाकस्तान (Kazakhstan) हा असा देश आहे, जिथे आईला 7 पेक्षा जास्त मुले असल्यास तिला सुवर्णपदक दिलं जातं.

प्रश्न : भारतातलं असं कोणतं रेल्वे स्टेशन आहे, जे दोन राज्यांच्या सीमेवर आहे ?
उत्तर : ‘नवापूर’ असं रेल्वे स्टेशन आहे, जे सुरत-भुसावळ मार्गावर आहे, जिथे स्टेशनच्या मध्यभागी दोन राज्यांच्या सीमा मिळतात. त्यामुळे या स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये आहे, तर उर्वरित अर्धा महाराष्ट्रात आहे…

प्रश्न : असा कोणता देश जिथे मांजरीची पूजा केली जाते?
उत्तर : इजिप्त (Egypt) असा देश आहे, जिथे मांजरींची पूजा केली जाते.

प्रश्न : नेत्रदान करताना डोळ्याचा असा कोणता भाग आहे, जो दान केला जातो ?
उत्तर : नेत्रदानात डोळ्याचा कॉर्निया हा भाग दान केला जातो.

प्रश्न : AIDS रोग कशामुळे होतो ?
उत्तर : AIDS हा रोग HIV व्हायरस मुळे होतो. जगभरात एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

प्रश्न : जगातील सगळ्यात पहिली वेबसाइट कोणती आहे ?
उत्तर : जगातील पहिली वेबसाइट ‘info.cern.ch’ आहे.

प्रश्न : सुभाषचंद्र बोस यांना सर्वप्रथम नेताजी कोणी म्हटलं होतं ?
उत्तर : सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीचा क्रूर शासक “अडॉल्फ हिटलर” ने सर्वप्रथम नेताजी म्हटलं होतं.

प्रश्न : मृत्यूवेळी रावणाचं वय किती होतं ?
उत्तर : श्री रामच्या हातून अंत होण्यापूर्वी रावणाचे वय सुमारे 39000 वर्षे, 16 महिने आणि 9 दिवस होतं..

प्रश्न : नोबेल पारितोषिक जिंकणारा पहिले भारतीय व्यक्ती कोण होते ?
उत्तर : रवींद्र नाथ टागोर

प्रश्‍न : भारतात पहिली FIR केव्हा आणि कोणत्या ठाण्यात नोंदवली गेली ?
उत्तर : भारतातील पहिली एफआयआर (FIR) 18 ऑक्टोबर 1861 रोजी दिल्लीतील ठाणे डिफेन्स कॉलनी स्टेशनवर उर्दू भाषेत नोंदवली गेली. आणि ही एफआयआर (FIR) भांडी चोरी केल्याबद्दल होती.

प्रश्न : अमेरिकेने जपानवर पहिला न्यूक्लिअर अटॅक कधी केला ?
उत्तर : अमेरिकेने जपानवर पहिला न्यूक्लिअर अटॅक 6 ऑगस्ट 1945 रोजी केला.

प्रश्न : असं काय आहे, जे आपण जन्माला येण्यापूर्वी खातो अन् जन्मल्यानंतरही…?
उत्तर : कोंबडी हा एक असा जीव आहे, जी जन्म होण्यापूर्वीची आपण खातो म्हणजे अंडी, अन् जन्म झाल्यानंतर आपण कोंबडी खातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *