महाअपडेट टीम, 30 जानेवारी 2022 : रम (Rum),व्हिस्की (Whiskey),व्होडका (Vodka),बिअर (Beer),ब्रँडी (Brandy), वाईन (Wine) आणि शॅम्पेन (Champagne) मध्ये काय फरक आहे तुम्हाला माहित आहे का ? आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की दारूचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांच्यात नेमका काय फरक आहे.
तुम्ही रम (Rum),व्हिस्की (Whiskey),व्होडका (Vodka),बिअर (Beer),ब्रँडी (Brandy), वाईन (Wine) आणि शॅम्पेन (Champagne) बद्दल कधी ना कधी ऐकलेच असेल, ते सर्व अल्कोहोलचे एक प्रकार आहेत किंवा नुसते अल्कोहोल आहे असे म्हणा. पण इतकी नावं ऐकल्यावर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की दारूचे अनेक प्रकार आहेत पण त्यात काय फरक आहे किंवा फक्त नावाचा फरक आहे. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की दारूचे किती प्रकार आहेत आणि त्यांच्यात काय फरक आहे ?
तसं, भारतात दारू अनेक नावांनी ओळखले जातं, जसे की मदिरा, दारू, आणि सोमरस इ. परंतु या सर्व नावांचा अर्थ अल्कोहोल असलेलं ड्रिंक आहे.
दारु बनवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, जसे की गहू, मका, बार्ली, ऊस, द्राक्षे, काजू इ.. अनेक फळे देखील वापरली जातात.
चला तर मग आता जाणून घेऊया दारूच्या विविध प्रकारांबद्दल :-
1.व्हिस्की (Whisky) :-
सामान्यत: लोक व्हिस्की (Whisky) खूप पितात, तसेच हे बनवण्यासाठी गहू आणि बार्ली सारख्या धान्यांचा वापर केला जातो. पण ती बनवण्याची पद्धत बिअरपेक्षा थोडी वेगळी आहे कारण ती धान्याच्या अर्धवट आंबण्याने बनवली जात नाही, तर धान्याच्या पूर्णता आंबण्याद्वारे, तसेच नंतर ऊर्धपातन करून बनवली जाते. व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, त्यात सुमारे 30 ते 65% अल्कोहोल आढळतं.
व्हिस्कीमध्ये एवरेज अल्कोहलचे प्रमाण 43% असतं. व्हिस्की साधारणपणे 2 प्रकारची असते , ज्यामध्ये पहिली माल्ट व्हिस्की (Malt whiskey), असते, माल्ट व्हिस्की अंकुरलेल्या धान्यापासून बनवली जाते जी पिण्यास चांगली आणि महाग असते. यानंतर, दुसरी ग्रेन व्हिस्की (Grain whiskey) आहे, या प्रकारची व्हिस्की कोंब न फुटता धान्यांपासून बनविली जाते. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की स्कॉटलैंड एक प्रमुख व्हिस्की उत्पादक देश आहे आणि येथील व्हिस्कीला स्कॉच (Scotch) असं म्हणतात.
2.ब्रांडी (Brandy) :-
ब्रांडीचे हे नाव एक डच शब्द ‘ब्रँडीविजन’ यावरून आलं आहे, ज्याचा अर्थ ‘बर्न वाइन’ (Burn wine) असा आहे. व्हिस्की डिस्टिलिंग करून ब्रँडी तयार केली जाते. ब्रँडीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60% पर्यंत असते. ब्रँडी प्रामुख्याने युरोपियन देशांद्वारे उत्पादित केली जाते.
3.रम (Rum) :-
रम (Rum) हा देखील एक दारूचा प्रकारचा आहे, आणि बहुतेक लोकांना हिवाळ्यात रम प्यायला आवडते. उसाचा रस किंवा मोलॅसिस रम बनवण्यासाठी आंबवले जातं.आणि डिस्टिल्ड केले जातं. रममध्ये 40 ते 70% अल्कोहोल असतं. रमचे उत्पादन प्रामुख्याने कॅरिबियन आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये (कोलम्बिया, गुयाना, वेनेजुएला, ब्राज़ील) येथे केले जातं. रम ही स्वस्तात पटकन चढणारी दारू आहे. भारतात रम पिणाऱ्यांची संख्या जास्त असते.
4. वोडका (Vodka) :-
वोडका एक पारदर्शक आणि चव नसलेलं अल्कोहोल आहे. वोडका बटाट्यापासून मिळालेल्या स्टार्चच्या किण्वन आणि ऊर्धपातनातून बनवलं जातं. त्यानंतर वोडक्यामध्ये फळांचे फ्लेवर दिले जाते. तसेच धान्य आणि मोलॅसेसपासून देखील वोडका बनवले जाते. वोडकामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 40-60% पर्यंत असतं. वोडकाचे उत्पादन प्रामुख्याने रशिया आणि पूर्व युरोपातील देशांमध्ये केले जातं.
7. शॅम्पेन (Champagne) :-
शॅम्पेन हे नाव बहुतेक वेळा आनंद साजरी करण्यास अथवा, जिंकल्याची भावना व्यक्त करण्यासाठी शॅम्पेन उघडणे आणि ते एकमेकांवर मजेमध्ये शिंपडणे हे देखील त्यातला भाग आहे, शॅम्पेन हा एक प्रकारचा वाइन आहे जो केवळ फ्रान्सच्या शॅम्पेन प्रदेशात बनवला जातो. शॅम्पेन बनवण्यासाठी चारडोने, पिनोट नायर आणि पिनोट म्यूनियर द्राक्षे वापरली जातात.
6. बीयर (Beer) :-
बीयरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 3 ते 30% पर्यंत असतं. पण लाइट बिअरमध्ये 4 % अल्कोहोल आणि 8% स्ट्रॉंग बिअरमध्ये वापरलं जातं. जर्मनमध्ये बिअर ही जगातील सर्वोत्तम बिअर मानली जाते. मका, गहू, ऊस, आणि बार्ली यांसारख्या धान्यांना अंशतः आंबवून बिअर तयार केली जाते आणि नंतर ते चांगले बनवण्यासाठी सुमारे 1 ते 2 आठवडे लागतात.
7.वाइन (Wine) :-
वाईन हा देखील एक मदिराचाच प्रकारचा आहे, वाइन बनवण्यासाठी फळांचे रस वापरले जातात, ज्यामध्ये द्राक्ष हे मुख्य फळ आहे. तसेच त्यात अल्कोहोलचे प्रमाण सुमारे 9 ते 18% असू शकतं. वाइनचे उत्पादन प्रामुख्याने फ्रान्समध्ये होतं. भारतातही वाईनचे बनवण्याचे प्रमाण वाढलं आहे. वाइन बीअरप्रमाणेच आंबवून तयार केली जाते. साधारणपणे, वाइनचे वर्गीकरण रंगाच्या आधारावर रेड वाईन (Red Wine) आणि व्हाईट वाईन (white wine) मध्ये केले जाते. परंतु वाइनचे वर्गीकरण द्राक्षांची क्वालिटी आणि प्रकार यावर केले जातं.
फायदे…
वाईन प्यायल्याने शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग वाढतो. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार होते. हे त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणून काम करतं. वाइन प्यायल्याने पिंपल्स, मुरुम आणि शरीरातील डाग दूर होतात. याच्या सेवनाने त्वचा मुलायम, सुंदर आणि मुलायम बनते. वाइनमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतात.
वाईनमध्ये आढळणारे ‘रेझवेराट्रोल’ शरीरातील सूज कमी करण्यासाठी तसेच हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच यामध्ये असलेले ‘इन्सुलिन सेन्सिटायझर’ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास खूप उपयुक्त आहे. वाइनमध्ये आढळणारे मेटाबॉलिक सिंड्रोम, हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहासारख्या जीवघेण्या आजारांपासून शरीराचे रक्षण करते. रेड वाईनच्या सेवनाने मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते तसेच तणाव दूर होतो…
प्रमाण :
महिला एका दिवसात सुमारे 118 मिली वाइन घेऊ शकतात.
तर पुरुष सुमारे 236 मिली वाइन घेऊ शकतात.
या लोकांनी वाईनचं चुकूनही सेवन करू नये :-
गर्भवती असल्यास
तुम्हाला यकृत किंवा स्वादुपिंडात समस्या असल्यास
याआधी कधी हृदयविकाराचा झटका आला असल्यास
रेड वाईनमध्ये असलेल्या पौष्टिक घटकांची यादी पहा…
पौष्टिक तत्व | मात्रा प्रति 100 ग्राम |
---|---|
पानी | 86.49 ग्राम |
एनर्जी | 85 केसीएल |
प्रोटीन | 0.07 ग्राम |
कार्बोहाइड्रेट | 2.61 ग्राम |
शुगर | 0.62 ग्राम |
कैल्शियम | 8 मिलीग्राम |
आयरन | 0.46 मिलीग्राम |
मैग्नीशियम | 12 मिलीग्राम |
फास्फोरस | 23 मिलीग्राम |
पोटैशियम | 127 मिलीग्राम |
सोडियम | 4 मिलीग्राम |
जिंक | 0.14 मिलीग्राम |
कॉपर | 0.011 मिलीग्राम |
सेलेनियम | 0.2 माइक्रोग्राम |
थियामिन | 0.005 मिलीग्राम |
राइबोफ्लेविन | 0.031 मिलीग्राम |
नियासिन | 0.224 मिलीग्राम |
विटामिन बी-6 | 0.057 मिलीग्राम |
फोलेट, टोटल | 1 माइक्रोग्राम |
फोलेट, फूड | 1 माइक्रोग्राम |
फोलेट, डीएफई | 1 माइक्रोग्राम |
कोलीन, टोटल | 5.7 मिलीग्राम |
कैरोटीन, बीटा | 1 माइक्रोग्राम |
ल्यूटिन+ जियाजैंथिन | 6 माइक्रोग्राम |
विटामिन के | 0.4 माइक्रोग्राम |
अल्कोहल, ऐथल (ethyl) | 10.6 ग्राम |
रेड वाईन बनवण्याची प्रक्रिया :
डिस्टेमिंग प्रक्रिया :
प्रथम काळी द्राक्षे खुडून वायनरीमध्ये नेली जातात. द्राक्षे तोडली की त्यांच्यासोबत पाने आणि डहाळ्याही येतात. यामुळे वाइनची चव अतृप्त किंवा जास्त कडू होऊ शकते. या प्रकरणात, द्राक्षे आणि डहाळे डेस्टेमिंग प्रक्रियेदरम्यान वेगळे केले जातात.
क्रशिंग :
डेस्टेमिंग प्रक्रियेनंतर, द्राक्षे ठेचली जातात. द्राक्षे किती क्रश करायची हे वाइनमेकरवर अवलंबून असते. ठेचलेले मिश्रण एका मोठ्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात पाईपद्वारे ओतले जाते आणि पुढील किण्वन प्रक्रियेसाठी पाठवले जाते.
किण्वन प्रक्रिया :
किण्वन दरम्यान तापमान नियंत्रित केलं जातं, कारण किण्वनातून भरपूर उष्णता सोडली जाते. जर हे तापमान नियंत्रित केलं नाही तर वाइन कडू होऊ शकते. आणि चव खराब होऊ शकते. या प्रक्रियेत घन आणि द्रव वेगळे केले जातात, म्हणजे रस फळांपासून वेगळा केला जातो. द्राक्षांमधून रस काढण्याची प्रक्रिया सूक्ष्मजीवशास्त्रीय परिवर्तनाद्वारे होते, ज्याला मालोलॅक्टिक किण्वन देखील म्हणतात.
या प्रक्रियेत, द्राक्षांमध्ये असलेल्या मॅलिक अँसिडचे बॅक्टेरियाच्या क्रियेमुळे लॅक्टिक अँ सिडमध्ये रूपांतर होते. रेड वाईन नंतर गाळून दुसऱ्या भांड्यात टाकली जाते. वाइन नंतर बाटलीत भरण्यापूर्वी स्टेनलेस स्टील किंवा लाकडी कंटेनरमध्ये ठेवली जाते. येथे कोणताही चव संबंधी शंका दुरुस्त करता येते.
अंतिम प्रक्रिया म्हणजे फिलटरेशन :
वाइन शेवटी गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दतीने पार केले जाते. येथे वाइनमध्ये शिल्लक असलेले कोणतेही जीवाणू आणि अनावश्यक सूक्ष्म पदार्थ काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर लाल वाइन शेवटी कॉर्क स्टॉपर्ससह काचेच्या बाटल्यांमध्ये भरले जाते.
टिप :- दारू सवय लावणारी गोष्ट आहे, स्वत:वरील नियंत्रण घालविणारी गोष्ट आहे. आपले व्यक्तीमत्व अति भावनीक, impulsive, सहज ताबा सुटणारे असेल, तर दूर राहिलेलेच बरे.